Grape Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Harvesting Season : बाजार समितीच्या अधिकृत केंद्रांवरच द्राक्षमण्यांची विक्री करा

Grape Market : खानगाव नजीक व उगाव येथील द्राक्षमणी लिलाव शुभारंभ काळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्राक्षमणी क्रेट्‍स‌चे विधिवत पूजन करण्यात आले. 

Team Agrowon

Nashik News : निफाड तालुक्यात द्राक्ष काढणी हंगाम सुरू झाला असून, द्राक्षांच्या पॅकिंगनंतर उरणाऱ्या द्राक्षमण्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्षमणी शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रांवरच विक्रीस आणावे, असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य भीमराज काळे यांनी केले.

खानगाव नजीक व उगाव येथील द्राक्षमणी लिलाव शुभारंभ काळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्राक्षमणी क्रेट्‍स‌चे विधिवत पूजन करण्यात आले. खानगाव नजीक येथे मुहूर्तावर आकाश भोसले यांचा द्राक्षमणी प्रतिकिलो २१ रुपये दराने विक्री झाला. पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत २२८ क्रेट्‍स आवक झाली.

त्यास प्रतिकिलो किमान ४, कमाल २५, तर सरासरी १९ रुपये मिळाले. तसेच उगाव येथे मुहूर्तावर लहू कडाळे यांचा द्राक्षमणी प्रति किलो ६१ या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत १६० क्रेट्‍स आवक होऊन प्रतिकिलो किमान ७, कमाल ६१ तर सरासरी २१ मिळाले.

लिलाव प्रारंभ प्रसंगी बाजार समितीचे सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून खानगाव नजीक व उगाव खरेदी-विक्री केंद्राची माहिती दिली. काळे म्हणाले, की खानगाव नजीक व उगांव परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने २ फेब्रुवारी २००९ पासून खानगाव नजीक व २६ जानेवारी २००४पासून उगाव येथे द्राक्ष हंगामात द्राक्षमणी लिलावास सुरुवात केली आहे.

गेल्या २० ते २१ वर्षांत या केंद्रां शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, बाजार समितीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने हे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापूर्वी द्राक्षमणी खरेदीदार थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे द्राक्षमण्यांची खरेदी करीत असे. स्पर्धा नसल्यामुळे बाजारभावात लूट तसेच पैशांची हमी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असे.

त्यामुळे बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्ष हंगामात उगांव, खानगाव नजीक, नैताळे व मानोरी खुर्द येथे द्राक्षमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खानगाव नजीक व उगाव येथे दरवर्षी द्राक्षमण्यांच्या खरेदी-विक्रीतून २ ते २.५ कोटी रुपयांची उलाढाल होते. खानगाव नजीक केंद्रावर सन २००९ ते २०२४ पर्यंत ६ लाख क्रेट्‍स द्राक्षमण्यांची आवक होऊन सुमारे १६.५० कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी झाली आहे.

तर उगाव केंद्रावर सन २००४ ते २०२४ पर्यंत १७ लाख क्रेट द्राक्षमण्यांची आवक होऊन सुमारे ४२ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. द्राक्षमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षमणी विक्री न करता या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी विक्रीस प्राधान्य देतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

YCMOU Open University: मुक्त विद्यापीठाची ‘फ्यूचर ऑफ लर्निंग’कडे वाटचाल; डॉ. कलसी

MGNREGA Workers Protest: ‘मग्रारोहयो’ ठप्प, शासन गप्प!

Farm Roads: पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवा

Bael Tree Conservation: निसर्ग मित्रच्या वतीने बेल वृक्ष संवर्धन कृती उपक्रम

Sugarcane Crushing Season: साताऱ्यात ऊस गाळपाची कोटीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT