Kunbi Record Agrowon
ॲग्रो विशेष

Kunbi Record : कुणबी जातीचे पुरावे, दस्तऐवज शुक्रवारपर्यंत सादर करा

Kunbi Report Update : कोल्हापुर जिल्ह्यातील नागरिकांकडे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबतचे उपलब्ध असलेले १९६७ पूर्वीचे पुरावे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यातील नागरिकांकडे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबतचे उपलब्ध असलेले १९६७ पूर्वीचे पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी जुनी अभिलेखे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कुणबी जातीच्या पुराव्याची १९६७ पूर्वीची कागदपत्रे या विशेष कक्षात शुक्रवारपर्यंत (ता. २४) सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा नियोजित असून त्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

या समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात शुक्रवारपर्यंत (ता. २४) स्वीकारण्यात येणार आहेत.

नागरिकांकडून सादर होणारी कागदपत्रे, पुरावे, अभिलेखे प्राप्त करून घेण्यासाठी विशेष कक्षासाठी नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, महसूल सहायक, अधीक्षक, लिपिक या दर्जाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबतचे उपलब्ध असलेले १९६७ पूर्वीचे पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी जुनी अभिलेखे कार्यालयीन वेळेत या विशेष कक्षात सादर करावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT