Wardha News : मोबाइलमुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर गावस्तरावरही वाढला आहे. त्यामुळेच आता ग्रामपंचायतीचा कर भरण्यासाठी देखील रोखीऐवजी क्युआर कोडला पसंती मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये या संबंधीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशभरात डिजिटल प्रणालींना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे पेमेंटकरिता रोखऐवजी डिजिटल करन्सीवर भर दिला जात आहे. त्यासाठी ऑनलाइन युपीआय ॲपचा वापरही वाढला आहे. नुकतीच बसमध्ये तिकीट काढण्यासाठी देखील ऑनलाइन पेमेंटच पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामुळे पारदर्शकता वाढत असल्याचा विश्वास केंद्र सरकारला आहे. त्याच कारणामुळे आता गावस्तरावर क्युआर कोडच्या माध्यमातून विविध कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये पाणी आणि घरपट्टी या दोन्हीचा समावेश आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्वच ग्रामपंचायती डिजिटल झाल्या आहेत. त्याच माध्यमातून आता ग्रामपंचायतस्तरावर नगरिकांना आर्थिक व्यवहर करता येतील.
राज्यात वर्धा आघाडीवर
डिजिटल इंडिया धोरणाअंतर्गंत ग्रामपंचायतींचा कारभाही ऑनलाइन करण्यात आला आहे. अशा डिजिटल ग्रामपंचायती सर्वाधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये वर्धा जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. या ठिकाणी सर्वच सर्व ग्रामपंचायती डिजिटल झाल्या आहेत. वर्धा तालुक्यात २ लाख ८२ हजार ७८, हिंगणघाट १ लाख ३ हजार ४९२, कारंजा ३२ हजार ९७५, आर्वी १ लाख ४ हजार ३७८, समुद्रपूर १० हजार २००, आष्टी ८ हजार ५८०, सेलू ३ हजार ६८९ याप्रमाणे व्यवहार झाले आहेत.
तालुकानिहाय डिजिटल ग्रामपंचायती
वर्धा ७६
हिंगणघाट ७६
कारंजा ५९
आर्वी ७२
समुद्रपूर ७९
आष्टी ४१
सेलू ६२
देवळी ६३
साडेपाच लाख रुपयांचा डिजिटल व्यवहार
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतस्तरावर पाच लाख ४५ हजार ३९५ रुपयांचे व्यवहार डिजिटल स्वरूपात झाले आहेत. यामध्ये देवळी तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यात ही प्रणाली आत्मसात करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.