Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

HTBT Cotton Seeds: प्रतिबंधित एचटीबीटी गुप्त व्यापार सीमेवर पोहोचला

Cotton Seeds Black Market: प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाण्यांनी पुन्हा एकदा सीमेवर हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांना सहज लागवड व तण नियंत्रणासाठी या वाणांचा मोह होत असून एजंटांच्या माध्यमातून काळ्या बाजारात विक्री जोमात सुरू आहे.

 गोपाल हागे

Akola News: आगामी खरीप हंगामात लागवडीच्या अनुषंगाने बाजारपेठेत बियाण्यांची लगबग लवकरच सुरू होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच प्रतिबंधित असलेली एचटीबीटी दाखल झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत लगतच्या अमरावती जिल्ह्यात दोन ठिकाणी असे बियाणे पकडण्यात आले आहे.

अकोल्यात मात्र, अद्याप कारवाईचा मुहूर्त निघालेला नाही. दुसरीकडे असे बियाणे दाखल झाल्याचा संशय असून प्रतिपाकीट १२०० रुपयांपर्यंत याची विक्री सुरू झालेली असल्याचे सांगितले जाते.

भारतात अद्याप एचटीबीटी बियाण्याच्या वापरावर केंद्र सरकारने कायदेशीर बंदी घातली आहे. यासाठी पर्यावरणावर दुष्परिणाम होण्याची भीती सांगितली जाते. तसेच, या बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होण्याचा धोका असून, त्याचे दीर्घकालीन परिणाम शेतीच्या उत्पादनक्षमतेवर होऊ शकतात, असेही बोलले जाते.

मात्र दुसरीकडे गेल्या काही हंगामांपासून तणनाशकांचा वापर करता येणारे कपाशीचे असे वाण सर्रास लागवड केली जात आहेत. काही जण या वाणांच्या वापराचे खुलेआम समर्थनही करू लागलेले आहेत.

सध्या शेतीच्या कामांसाठी मजूर मिळेनासे झाल्याने तसेच खर्च वाढत असल्याने शेतकरी या बियाण्यांना पसंती देत आहेत. लागवडीनंतर तणनाशकाचा वापर सहज होऊ शकत असल्याने अशा प्रकारच्या बियाण्यांची मागणी वाढत आहे. हा सर्व व्यवहार छुप्या पद्धतीने होत असून, या व्यवहारासाठी कुठलीही अधिकृत पावती शेतकऱ्याला दिली जात नाही. काही गावात एजटांच्या माध्यमातून हा व्यवहार फोफावत चालला आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, अकोट या तालुक्यांमध्ये सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी मे महिन्याच्या अखेरीस, जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करीत असतात. प्रतिबंधित असलेले हे बियाणे बेकायदेशीररीत्या वाढीव दराने शेतकऱ्यांना विकण्यासाठी एजंटांच्या साखळ्या कामाला लागलेल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन

Smart Farming: स्मार्ट शेती : गरज, तंत्रज्ञान आणि भविष्य

Bhusar Market Closure: मार्केट यार्डातील भुसार बाजार २५ फेब्रुवारीला राहणार बंद

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

SCROLL FOR NEXT