Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : एकात्मिक कापूस लागवड तंत्रज्ञानातून उत्पादकता वाढवणे शक्य

Integrated Cotton Cultivation : एकात्मिक कापूस लागवड तंत्रज्ञानातून कापूस उत्पादकता वाढवता येईल, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले.

Team Agrowon

Jalana News : एकात्मिक कापूस लागवड तंत्रज्ञानातून कापूस उत्पादकता वाढवता येईल, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले.

विशेष कापूस प्रकल्पांतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना व प्रभात सीड्स, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंठा तालुक्यातील मोसा येथील शेतकरी देविदास राठोड यांच्या शेतावर कापूस शेती दिन व पीकपाहणी कार्यक्रमात श्री. सोनुने बोलत होते.

कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी, मृद्‍शास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी, प्रभात सीड्सचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र तायडे, मोसा येथील प्रगतशील शेतकरी भीमराव राठोड आदी उपस्थित होते.

श्री सोनुने म्हणाले, की कापूस पिकात एकरी झाडांची संख्या वाढविणे, योग्य प्रमाणात योग्य वेळी शिफारस खत मात्रा देणे, झाडांची वाढ मर्यादित ठेवणे व ९० दिवसांनंतर झाडाचा शेंडा खुडने अशा पद्धतीने कापूस लागवड तंत्रज्ञानाचा वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture MSP: शनिवारपासून सोयाबीन, मूग, उडीद हमीभावाने खरेदी सुरू!

Weather Update: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; उत्तरेकडील जिल्ह्यांत तापमान घसरले

Market Update: सोयाबीनचा दर टिकून, मुगावर दबाव कायम

Solar Pump Scheme: अठरा हजारांवर शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाची प्रतीक्षा

Post Harvest Management: संत्रा फळाचे काढणीपश्चातचे नुकसान टाळण्यासाठी सोपे उपाय

SCROLL FOR NEXT