Sugar Production
Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production In Marathwada : मराठवाड्यात २ कोटी ३० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : यंदाच्या ऊसगाळप हंगामात (Sugarcane Crushing Season) सहभाग नोंदविणाऱ्या मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील एक कारखाना वगळता सर्व ६२ कारखान्यांचा गाळप हंगाम १३ एप्रिलपर्यंत आटोपला होता.

तोपर्यंत या सर्व कारखान्यांनी २ कोटी ४३ लाख १० हजार टन उसाचे गाळप करत २ कोटी ३० लाख ३४ हजार क्विंटल साखरेचे विक्रमी उत्पादन केले आहे.

सर्वांत शेवटी बीड व जालन्यात कारखान्यांचे ऊसगाळप आटोपले असून, इतर सर्व कारखान्यांच गाळप दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यातच आटोपले होते हे विशेष.

यंदाच्या ऊसगाळप हंगामात मराठवाड्यातील ज्या ६३ कारखान्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये धाराशिवमधील १३, लातूरमधील १२, छत्रपती संभाजीनगरमधील ७, जालन्यातील ५, बीडमधील ८, परभणीतील ७, हिंगोलीतील ५ व नांदेडमधील ६ कारखान्यांचा समावेश होता.

या सर्व जिल्ह्यातील कारखान्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना हिंगोली, नांदेड व लातूर या पाच जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांपुढे राहिला आहे.

दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.९८ टक्के परभणीमधील कारखान्यांचा साखर उतारा ९.९४ टक्के, तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा केवळ ७.४० टक्के राहिला आहे.

जिल्हा - धाराशिव

कारखाने- १३

ऊसगाळप- ५० लाख १६ हजार ६४७

साखर उत्पादन- ४५ लाख ०५ हजार १७७

साखर उतारा - ८.९८

जिल्हा - छत्रपती संभाजीनगर

कारखाने - ७

ऊसगाळप - २० लाख ६२ हजार ५९८

साखर उत्पादन - २१ लाख ९२ हजार २४६

साखर उतारा- १०.६३

जिल्हा- जालना

कारखाने - पाच

ऊसगाळप - २४ लाख २१ हजार ५३३

साखर उत्पादन - २५ लाख १५ हजार ५१०

साखर उतारा - १०.३९

जिल्हा - बीड

कारखाने- ८

ऊसगाळप - ४२ लाख ४३ हजार ६७७

साखर उत्पादन - ३१ लाख ४२ हजार ०१५

साखर उतारा - ७.४०

जिल्हा - परभणी

कारखाने - ७

ऊसगाळप - २८ लाख ९४ हजार ९८३

साखर उत्पादन - २८ लाख ७७ हजार ९४०

साखर उतारा - ९.९४

जिल्हा- हिंगोली

कारखाने - ५

ऊसगाळप - १५ लाख ५६ हजार ५५०

साखर उत्पादन - १६ लाख ४२ हजार ०२५

साखर उतारा - १०.५५

जिल्हा - नांदेड

कारखाने - ६

ऊसगाळप - १७ लाख ७४ हजार ४४१

साखर उत्पादन - १७ लाख ७७ हजार ६२०

साखर उतारा - १०.०२

जिल्हा - लातूर

कारखाने - १३

ऊसगाळप- ४३ लाख ३९ हजार ८०५

साखर उत्पादन - ४३ लाख ८२ हजार ०५६

साखर उतारा- १०.१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon : मॉन्सूनची प्रगती शक्य

Sugar Rate : साखरेचे दर स्थिरावले; मागणीत काहीशी घट

Farm Ponds : वर्षभरात उभारली चौदा हजार शेततळी

Bajara Market : खानदेशात बाजरीची आवक वाढली

Tur Rate : यवतमाळमध्ये तुरीला कमाल १२ हजार ३०० रुपये दर

SCROLL FOR NEXT