Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : सोयाबीनसह कपाशीचीही हमीपेक्षा कमी भावात खरेदी

Soybean MSP : यंदा सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. यातूनही कसाबसा घरात आलेला कापूस, सोयाबीनला शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भाव लागत आहे.

Team Agrowon

Beed News : यंदा सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. यातूनही कसाबसा घरात आलेला कापूस, सोयाबीनला शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भाव लागत आहे.

बारदाना मिळत नसल्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाले नाहीत तर, जिनिंगवरही ओलाव्याचे कारण दाखवत कापसाला सात हजाराच्या खाली भाव मिळत आहे. दिवाळीच्या सणामुळे मिळेल त्या भावात शेतीमाल विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

बीड जिल्ह्यात ग्रीन बेल्ट अन् सधन तालुका म्हणून ओळख असलेल्या माजलगाव तालुक्यात मुबलक पाण्यामुळे शेतकरी मोठ्याप्रमाणात बागायती शेती करतात. गतवर्षी माजलगाव धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने उसाचे क्षेत्र घातले होते; यामुळे सोयाबीन, कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती.

यंदा मॉन्सूनच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार बॅटींग केली. गतवर्षीपेक्षा दुप्पट अन सरासरीपेक्षा अधिक पाउस पडल्याने खरीपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी पिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली.

परतीचा पाऊसही चांगलाच बरसल्याने अनेक ठिकाणी कापसाच्या वाती झाल्या तर, सोयाबीन पाण्याखाली गेले होते. यातूनही कसबसे पदरात पडलेल्या शेतीमालाला बाजारात मात्र शासकीय हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. घोषणा करूनही अद्याप खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत.

वरिष्ठस्तरावरून आम्हाला आत्तापर्यंत बारदाणा मिळालेला नसल्याने सोयाबीनची शासकीय खरेदी सुरु करण्यात आली नाही. बारदाणा मिळताच खरेदी केंद्र सुरु करण्यात येईल.
- अमित नाटकर, चेअरमन, ॲड. रामराव नाटकर शेती निविष्ठा संस्था.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

E-Pashu App : पशुसंवर्धन विभागाकडून पशू अ‍ॅपचा प्रभावी वापर

Humani Attack : बुलडाणा जिल्ह्यात हुमणीचा वाढता प्रादुर्भाव

Rain Crop Loss : रिसोड, मंगरूळपीर तालुक्यांत अतिवृष्टीचा कहर

SCROLL FOR NEXT