MSP Procurement : साताऱ्यात सोयाबीन आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरु होणार

Soybean Procurement : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार सोयाबीन खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
MSP Procurement
MSP ProcurementAgrowon
Published on
Updated on

Satara News : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार सोयाबीन खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड, कोरेगाव व फलटण येथील तालुका सहकारी खरेदी- विक्री संघांना केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची होणार लूट थांबणार आहे.

केंद्र शासनाने २०२४-२५ वर्षाकरिता सोयबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रती क्विंटल हमीभाव निश्‍चित केला आहे. मात्र जिल्ह्यात व्यापाऱ्याकडून ४३०० ते ४४०० रुपये दराने खरेदी केली जात होती.

यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी राज्य पणन महासंघामार्फत जिल्ह्यातील कऱ्हाड, कोरेगाव व फलटण येथील तालुका सहकारी खरेदी- विक्री संघांना केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

MSP Procurement
MSP Procurement : शिराढोणला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणार

त्यानुसार या तीनही ठिकाणी तातडीने केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, तसेच सातारा, वाई व जावळी (कुडाळ) येथेही खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यास मान्यता मिळताच ही खरेदी केंद्रही सुरू करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर सोयाबीन आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक प्रत व त्यांचे नावे असणारा आठ अ व सातबारा उतारा (त्यावर चालू वर्षी सोयाबीन पीक पेरा नोंद असणे आवश्यक) खरेदी केंद्रांवर सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांशिवाय शेतकऱ्यांची नोंदणी होणार नाही. ऑनलाइन नोंदणीनंतर क्रमवारीनुसार शेतकऱ्याला केंद्रावर सोयाबीन घेऊन येण्यास एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.

MSP Procurement
MSP Procurement : सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता निश्चित

संबंधित शेतकऱ्यांनी त्यांना दिलेल्या वेळेत केंद्रावर नाफेडने निश्चित केलेल्या एफएक्यू दर्जाचे म्हणजेच चांगले वाळवलेले बारा टक्के पेक्षा कमी आर्द्रता असलेले व काडी-कचरा, दगड माती नसलेले सोयाबीन घेऊन येणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन केंद्रावर आणण्यापूर्वी नमुना घेऊन आर्द्रता व प्रतवारी तपासणी करून घेतल्यास गैरसोय होणार नाही. शेतकऱ्यांनी खराब व भिजलेले सोयाबीन केंद्रावर आणू नये, खराब माल स्वीकारण्यात येणार नाही.

केंद्रावर खरेदी केलेल्या सोयाबीनचे पेमेंट ऑनलाइन करण्यात येणार आहेत. त्यामुळे दिलेला बँक खाते क्रमांक अचूक असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित खरेदी- विक्री संघ, उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा पणन अधिकारी, पणन महासंघाच्या सातारा कार्यालयाशी संपर्क साधावा.
- संजय सुद्रिक, जिल्हा उपनिबंधक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com