Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market News : हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी

Cotton Procurement : खानदेशात कापसाची आवक किंवा पहिली वेचणी पूर्वहंगामी पिकात सुरू आहे. दर्जेदार कापूस येत असून, दर मात्र कवडीमोल आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कापसाची आवक किंवा पहिली वेचणी पूर्वहंगामी पिकात सुरू आहे. दर्जेदार कापूस येत असून, दर मात्र कवडीमोल आहेत. ५४००, ५५०० ते ६०००, ६२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात कापसाची खरेदी केली जात आहे. कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्याने शासकीय खरेदीचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

कापसाला २०२३-२४ या हंगामात मध्यम धाग्यासंबंधी सहा हजार ६२० आणि लांब धाग्यासाठी सात हजार २० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर झाला आहे. परंतु एवढा दर खानदेशातील कुठल्याही बाजारात सध्या नाही.

कापसाची खेडा खरेदी खानदेशात केली जाते. बाजार समित्यांत कुठलीही आवक होत नाही. खेडा खरेदीत एजंट, खरेदीदार मनमानी करीत असून, हमीभावापेक्षा कमी दर आहेत.

यंदा कापसाच्या खरेदीचा मुहूर्त कारखानदारांनी गणेशोत्सवात केला होता. त्या वेळेस एक ते दीड किलो कापसाची खरेदी सात हजार ५३, सात हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल या दराने करण्यात आली होती. परंतु गणेशोत्सवाचा कालावधी संपून काही दिवसही उलटत नाहीत तोच कापसाची कवडीमोल दरात खरेदी सुरू झाली.

खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू आहे. वेचणीचा खर्च व यापूर्वीची मजुरी लक्षात घेता उत्पादन खर्च १० ते १२ टक्के वाढला आहे. कमी पावसात कोरडवाहू पिकाचे नुकसान झाले आहे. कापसाची फारशी आवक नाही, तरीदेखील कमी दर्जा, कमी मागणी अशी कारणे सांगून हमीभावापेक्षा कमी दर दिले जात आहेत.

जळगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा या बाजार समित्यांअंतर्गत खरेदी सुरू आहे. पण या खरेदीवर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. यामुळे शेतकऱ्यांची नाडवणूक होत आहे.

मागील काही दिवस कोरडे वातावरण आहे. त्यापूर्वीच्या कापसाची वाळवणूक शेतकऱ्यांनी केली व तो साठविला. दर्जा चांगला आहे. शुभ्रता, ट्रॅशही कापसात कमी आहे. तरीदेखील हमीभावापेक्षा दर कमी असल्याने शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy: अमरावती जिल्ह्यात घरकुलांमध्ये मिळणार सौर ऊर्जेचा लाभ

Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Flaxseed Farming: धान उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची जवसाला पसंती

Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण

Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT