C P Radhakrisnan  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Processing : ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र राज्य शेतमाल उत्पादन आणि फळपिकांसाठी देश पातळीवरील आघाडीचे राज्य आहे. पारंपारिक शेतीला या राज्यातील शेतकरी आता आधुनिकतेची जोड देत आहे. यामागे कृषी विद्यापीठांचे योगदान आहे. ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्राला भेट देत शास्त्रज्ञांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्यासह विद्यापीठाचे संशोधक, शास्त्रज्ञ उपस्थित होते.

यंदा विद्यापीठ शिवार फेरीच्या माध्यमातून व्यावसायिक शेतीचे शाश्वत आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतल्याने भविष्यात नगदी पिकांसह तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्र वाढ अपेक्षित असल्याचे सांगतानाच गाव पातळीवरच प्रक्रिया उद्योग निर्माण होणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, की यंदा २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी जिवंत पीक प्रात्यक्षिके साकारत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याच्या शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावे व शास्त्रज्ञासोबत चर्चेद्वारे शेतीविषयक शंका समाधान करता यावे या हेतूने विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन केले होते होते.

शिवार फेरीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील जवळपास सर्व पिके व त्यांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता यावे या हेतूने गहू संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांच्या विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती येथे लावण्यात आलेले आहेत.

तसेच विद्यापीठाचे महत्त्वाचे १२ शिफारशीचे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. अकोला येथे जिल्हा दौऱ्यासाठी आगमन झाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केलेला भेट दिली व विविध आधुनिक उपक्रमांची माहिती करून घेतली.

विविध घटकांचा आढावा

राज्यपालांनी येथील शासकीय विश्रामगृहावर विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य, माध्यम तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT