Jaggery Plant agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Plant : गूळ उद्यागोवर कामागारांची समस्या, आवक घटल्याने दर गुळाचे दर वाढणार?

Kolhapur Jaggery : कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी बरोबर गुळाचा उद्योगही मोठ्या प्रमाणात चालतो कोल्हापुरी गुळ हा जगप्रसिद्ध आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Gul Plant : कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी बरोबर गुळाचा उद्योगही मोठ्या प्रमाणात चालतो कोल्हापुरी गुळ हा जगप्रसिद्ध आहे. परंतु यंदा गूळ हंगामाला घरघर लागल्याचे चिन्हे दिसत आहेत. गूळ उद्योगाला सर्वात महत्वाचे मनुष्यबळाची गरज असते हाच प्रश्न गुऱ्हाळ घर मालकांना सतावत आहे. याचा परिणाम गुळ उत्पादनावर होत असल्याचे चित्र आहे. यामुळे गुळाची आवक कमी झाल्याने भविष्यात गुळ्याच्या दरात २०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही वर्षात कर्नाटक सिमाभागासह बीड, धाराशीव, लातूर, बार्शी, मंगळवेढा भागातून गुळकरी कामगार येथील गुऱ्हाळ घरांवर कामासाठी येत असतात. परंतु मागच्या काही वर्षांत कामगारांची संख्या दरवर्षी १० ते २० टक्के घट होत आहे. यंदाही जवळपास १५ हजार गुळकरी कामगार येथे आले. तेच जवळपास दीडशे गुन्हाळ घरांवर काम करत आहेत.

औरंगाबाद येथे झालेल्या औद्योगिक वसाहतीत गुळकरी कामगारांची नवी पिढी बारमाही नोकरीला जाऊ लागली. त्यामुळे घरच्या पारंपरिक गूळ बनवण्याच्या उद्योगात - नवी पिढी फारशी येत नाही, परिणामी मराठवाड्यातून कोल्हापूरला गूळ बनविण्यासाठी येणाऱ्यांमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले बहुतेक गुळवे किंवा गूळ कामगार येत आहेत. त्यांची एकूण संख्या घटली आहे.

मनुष्यबळ शोधण्यात वेळ गेल्याने यंदाचा गूळ हंगाम सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा उशीर झाला. पूर्वी २४ तासांत चार ते सहा आदणे होत होती. सध्या दोन किंवा तीन आदणे होतात. अपवादात्मक गुन्हाळ घरांवर रात्रीचे गूळ उत्पादन घेतले जाते. त्यामुळे एकूण गूळ उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारपेठेतील आवक निम्म्याने घटली आहे.

यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत दोनशे ते रुपयांनी भाव वाढला आहे. पण, मोजकाच गूळ बाजारात येत आहे. त्याचा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होतो. साखरेचे मिश्रण न करता गूळ बनवला तर गुळाला आणखी चांगला भाव मिळणार आहे.गूळ बनवण्यासाठी कामगारांची संख्या अपुरी आहे. मजुरी वाढती आहे.

  • वीजपुरवठा, पाणी तसेच खाणपान असा हंगमातील एकूण खर्च गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढला. त्यामुळे गुन्हाळघर चालवणे जिकिरीचे बनले आहे. तरीही चांगल्या प्रतीचा गूळ बाजारपेठेत आणला जात नाही. त्यामुळे भाव वाढूनही फारसा नफा उरत नाही.

    बाजीराव पाटील, गूळ उत्पादक

आवक अशी

नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ : १५ हजार ते २२ हजार गूळ रवे, डिसेंबर २०२३ : १० हजार ते १४ हजार गूळ रवे.

सरासरी दर असे

२०२२ : ४ हजार ते ४ हजार ३००, २०२३ : ४ हजार ५०० ते ४ हजार ६००, १ किलो लहान गूळ रवे : ३ हजार ८०० ते ४ हजार ७००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT