Green Fodder Issue agrowon
ॲग्रो विशेष

Green Fodder Issue : हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादनात तब्बल ३० टक्क्यांनी घट

animal feed Rate : पशुखाद्य कंपन्यांनी खाद्याच्या दरात केलेल्या दरवाढीमुळे दूध व्यवसायही अडचणीत आला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Green Fodder : यंदाचा गळीत हंगाम संपल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच उष्णतेचा पारा ४० अंशांवर गेल्याने दूध उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. चाऱ्यासाठी दूध उत्पादकांना कसरत करावी लागत आहे.

सध्या तरी पशुपालकांना दुभत्या जनावरांसाठी पावसाळा सुरू होईपर्यंत हिरव्या आणि सुक्या चाऱ्याची तजवीज करताना कसरत होत आहे. याचा दुभत्या जनावरांवर परिणाम होऊन दूध उत्पादनात कमालीची घट झाली आहे.

पशुखाद्य कंपन्यांनी खाद्याच्या दरात केलेल्या दरवाढीमुळे दूध व्यवसायही अडचणीत आला आहे. बदललेल्या वातावरणामुळे यंदा गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच उसाला तुरे फुटल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे हाल झाले. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतो; परंतु आता चाऱ्याअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. अलीकडे ग्रामीण भागात कुटुंबासाठी आर्थिक हातभार आणि दैनंदिन

हक्काचे दूध मिळावे तसेच शेतीस पूरक व पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणून शेतकरीवर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. सध्या ऊस हंगाम संपल्याने ओल्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओला चारा कमतरतेमुळे पशुखाद्य, हिरवा चारा, सुका चारा यांच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.

साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम समाप्तीनंतर काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून हत्ती गवत, शाळू, मका ही पिके केली आहेत. पण ती विक्रीसाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे बहुसंख्य पशुपालकांना पावसाळा सुरू होऊन हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी अद्याप दोन महिने अवधी आहे. यामुळे जनावरे जतन करणे नाकीनऊ येणार आहे. पशुपालकांनी विक्रीसाठी उपलब्ध होणारा तयार कडबाकुट्टी व मका पीक घेण्यावर भर दिला आहे.

पशुखाद्याचे एकूण दर

जानेवारीपासून पशुखाद्यामध्ये सर्वच कंपन्यांच्या सामान्य पॅलेटच्या दरात ५० किलोच्या पोत्यामागे १०६० ते १९६५ पर्यंत वाढ झाली आहे. भुशाचे ४५ किलोचे पोते १३५० रुपये झाले आहे. सरकीच्या ४० किलोच्या पोत्याचा दर १२०० ते २५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT