Animal Poisoning : कुठेही दिसणाऱ्या या वनस्पती जनावरांसाठी आहेत विषारी

Team Agrowon

तीव्र वासामुळे तसेच चवीला रुचकर नसल्यामुळे जनावरे शक्यतो विषारी वनस्पती खात नाहीत. परंतु बऱ्याचदा दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची कमतरता असल्यामुळे जनावरे या हिरव्या वनस्पतींकडे आकर्षित होऊन नाइलाजास्तव खातात.

Animal Poisoning | Agrowon

विषारी वनस्पती खाल्याने जनावरांना विषबाधा होते. तसेच जर जनावर जास्त वेळ उपाशी असेल तर अशा स्थितीत त्यांना चरण्यास सोडल्यानंतर ते अधाशीपणाने खातात. त्या वेळी देखील विषारी वनस्पती खाण्यात येऊन विषबाधा होण्याची शक्यता वाढते.

Animal Poisoning | Agrowon

कन्हेर

या वनस्पतीची पाने किंवा बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यास, जनावरांची भूक मंदावणे, पोटात वेदना होणे, हगवण लागणे, अशक्तपणा येणे, स्नायू थरथर कापणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, आकडी येणे, हृदयाचे ठोके कमी होऊन शेवटी मृत्यू होतो.

Animal Poisoning | Agrowon

घाणेरी

ही विषारी वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीमधील विषारी घटकांमुळे मुख्यतः यकृताची हानी होते.

Animal Poisoning | Agrowon

बेशरम

या वनस्पतीमध्ये लायसेर्जिक आम्ल अल्कलॉइड व सॅपोनिन हे विषारी घटक असतात. तसेच ही वनस्पती ‘नायट्रेट’ हा घटक मोठ्या प्रमाणात मातीमधून शोषून तो साठवून ठेवते. या घटकामुळे देखील विषबाधा होऊ शकते.

Animal Poisoning | Agrowon

रुई किंवा रुचकी

या वनस्पतीचे सर्वच भाग जसे की पाने, फुले, शेंगा या विषारी असतात. या वनस्पतीमध्ये कॅलोट्रोक्झीन, कॅलॅक्टिन हे विषारी घटक असतात.

Animal Poisoning | Agrowon

धोतरा

झाडांचे सर्व घटक विषारी आहेत. पण मुख्यतः त्याची पाने आणि बिया जास्त विषारी असतात.

Animal Poisoning | Agrowon