Farmers Suicide Measures  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Death Measures : आत्महत्या रोखण्यासाठी योजनांचा लाभ प्राधान्याने शेतकऱ्यांना द्यावा

Agriculture Scheme : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व प्रगतीकरीता शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात.

Team Agrowon

Parbhani News : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व प्रगतीकरीता शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा, असे निर्देश (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी दिले.

मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची दखल घेऊन त्यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकरीता अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा आणि शेती विकासाचे कार्यक्रम राबविणे व त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे अशा उपायायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुर्नरचना करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अॅड. पाटील बोलत होते. शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांच्यासह कृषी, रोजगार हमी योजना, कृषी विद्यापीठ, रेशीम, शिक्षण, आरोग्य, वन, कौशल्य विकास, सहकार, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन अनेक महत्त्वाच्या योजना राबवित आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने करावे. शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तालुकास्तरावर रोगनिदान शिबीर आयोजित करावीत.

सावकारी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत. मुलांसाठी शिक्षणाची उत्तम सोय, स्पर्धा परीक्षा वाचनालय, शाळेत क्रीडांगण सुविधा उपलब्ध करुन द्यावी. कौशल्य विकास योजनांची प्रचार-प्रसिद्धी करावी.

शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीला प्रोत्साहन द्यावे. पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव व मोबाईल क्रमांक ग्रामपंचायत कार्यालयात दर्शनी भागात बोर्डावर ठळक नमूद करावा. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमालांचा किमान आधारभूत मूल्याचा फलक दर्शनी भागावर लावावा.

जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीचा प्रेरणा प्रकल्प प्रभावीपणे राबवावा. वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईचे प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. गायरान जमिनीवर चारा लागवड करून शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करुन द्यावा. निरोगी जीवनासाठी सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT