Kartiki Vari Agrowon
ॲग्रो विशेष

Kartiki vari 2024 : कार्तिकी यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्या

Pandharpur Yatra : आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ः कार्तिकी वारी आढावा बैठक

Team Agrowon

Solapur News : सोलापूर ः कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच परराज्यांतून लाखो वारकरी भाविक येतात. १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून, यात्रेचा कालावधी २ ते १५ नोव्हेंबर असून, वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावल,

जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, व्हीसीद्वारे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्यधिकारी प्रशांत जाधव, सां. बा. विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निंबकर उपस्थित होते. श्री. पुलकुंडवार म्हणाले, की कार्तिकी यात्रा सोहळा यशस्वी, निविघ्नपणे पारपाडण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी.

नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्वच्छतेसाठी जादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता, टॉयलेट स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था आदी कामे तत्काळ करावीत. आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्यकार्यकारी अधिकारी जंगम यांनीही केलेल्या तयारीची माहिती दिली.

भाविकांच्या सुरक्षेचीही काळजी घ्या

पोलिस प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे तसेच मंदिर समितीनेही जादा सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. मंदिर समिती पत्राशेड, दर्शन रांग तसेच दर्शन रांगेमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या उड्डाण पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट, फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट करून घ्यावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Storage : कांदा साठवणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

Soybean Market : सोयाबीन बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच; शेतकरी मेटाकुटीला

International Flower Exhibition : आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभ

Sugarcane Agriculture Damage : उसाला तुरे फुटले तरी साखर कारखाने बंदचं, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात लोकशाहीचा लोकोत्सव, ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान; अनेक ठिकाणी मशीनमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT