19th Installment of PM Kisan Scheme  Agorwon
ॲग्रो विशेष

19th Installment of PM Kisan Scheme : पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचं पंतप्रधानांनी केलं वितरण; शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा

PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांचं कल्याण करणं हेच एनडीए सरकारचं प्राधान्य आहे. मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम केलं आहे, असा दावाही पंतप्रधान मोदींनी यावेळी भाषणात केला. तसेच चारा घोटाळ्यावरून विरोधकांना टोला लगवला.

Dhananjay Sanap

PM Kisan Yojana 19th installment : बिहारमधील भागलपुर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता.२४) करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी बटन दाबून ९.८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीमार्फत २२ हजार कोटी रुपये वितरित केले.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, कृषिमंत्री रामनाथ ठाकूर, बिहारचे राज्यपाल मोहमद आरीफ खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आदि उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन उपस्थित होते.

देशातील शेतकऱ्यांचं कल्याण करणं हेच एनडीए सरकारचं प्राधान्य आहे. मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम केलं आहे, असा दावाही पंतप्रधान मोदींनी यावेळी भाषणात केला. तसेच चारा घोटाळ्यावरून विरोधकांना टोला लगवला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "बिहार आणि देशातील सर्व शेतकरी कुटुंबांचं अभिनंदन करत आहे. मी लाल किल्ल्यावरुन गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला देशाचे आधारस्तंभ असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आज वाटप करण्यात आलेल्या पीएम किसानच्या लाभात बिहारमधील ७५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १६०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. एनडीए सरकारचं प्राधान्य शेतकरी कल्याण हेच आहे." असंही मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "युरियासाठी शेतकऱ्यांना काठ्या खाव्या लागत होत्या. युरियाचा काळाबाजार केला जात होता. आता मात्र शेतकऱ्यांना पुरेसं खत मिळत आहे. आमच्या सरकारने कोरोनाच्या काळातही खतांची टंचाई भासू दिली नाही. एनडीए सरकार सत्तेत नसती तर शेतकऱ्यांना खतांसाठी काठ्या झेलाव्या लागल्या असत्यात. जगभरात एका खताची बॅग ३००० हजार रुपयांने मिळते. परंतु आम्ही शेतकऱ्यांना ३०० रुपयांपेक्षा कमी पैशात एक बॅग देत आहोत. एनडीए सरकार नसती तर युरियाची एक बॅग ३ हजार रुपयांना मिळाली असती." असं म्हणत विरोधकांना मोदींनी टोला लगावला.

खत अनुदानामुळे शेतकऱ्यांचे १२ हजार कोटी रुपयांची बचत झाली, असा दावाही पंतप्रधानांनी केला. तसेच मागील सहा वर्षात पीएम किसान योजनेतून आतापर्यंत ३ लाख ७० हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, बिहारमधील विधानसभा निवडणूक दहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे बिहारमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी एनडीए सरकारकडून आखणी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी पीएम किसानच्या १८ व्या हप्त्याचं वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमातून वितरण केलं होतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT