Farmer Compensation: महिला शेतकऱ्याला मोबदला न दिल्याने अधिकाऱ्याचे साहित्य जप्त

Government Office Seized: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न मिळाल्याने महिला शेतकरी सीमा लेंडवे यांनी कायदेशीर लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानंतरही मोबदला न मिळाल्याने, अधिकाऱ्याच्या खुर्चीसह संगणक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
Women Farmer Compensation
Women Farmer CompensationAgrowon
Published on
Updated on

Manchar News: ‘‘पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग मंचर-निघोटवाडी (ता.आंबेगाव) बाह्य वळण रस्त्यासाठी शेतकरी सीमा सुदाम लेंडवे (रा.मंचर) यांची २३ गुंठे जमीन संपादन करण्यात आली. याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम यांनी एक कोटी ३९ लाख ८४ हजार रुपये वाढीव मोबदला दिला नाही.

त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे-वारजे कार्यालयातील कदम यांच्या खुर्चीसह संगणक व फॅन आदी साहित्य शुक्रवारी (ता.२१) जप्त करण्यात आले आहे,’’ अशी माहिती लेंडवे यांचे वकील गौरव पोतनीस व अॅड. पल्लवी पोतनीस यांनी दिली.

Women Farmer Compensation
Farmer Compensation : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

महामार्गाचा विकास करण्यासाठी निघोटवाडी गावातील लेंडवे यांची जमीन संपादित केली होती. त्यावेळी त्यांना कमी आर्थिक मोबदला मिळाला होता. त्यामुळे त्यांनी अॅड. पल्लवी पोतनीस यांच्या मार्फत लवादाकडे वाढीव नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता. त्यामध्ये त्यांना वाढीव मोबदला देण्यास लवादाने ३० ऑगस्ट २०२२ रोजी मान्यता दिली होती. सदर रक्कम लवादाकडे जमा करावी म्हणून अनेकदा लेंडवे व त्यांच्या वकिलाने सतत पाठपुरावा केला.

पण राष्ट्रीय महामार्ग विभागाने पैसे भरण्यास टाळाटाळ केली. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी जप्तीची अंमलबजावणी करण्याचा आदेश २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पारित केला. न्यायालयाचे बेलिफ व लेंडवे यांनी शुक्रवारी महामार्गाच्या कार्यालयात जप्ती वॉरंट बजावले.

Women Farmer Compensation
Farmers Compensation : नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी

वॉरंट बजावताना महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे खोटी आश्वासने देण्याचा प्रयत्न केला व पैसे लवकरात लवकर कोर्टात जमा करू, असे मोघम आश्वासन देत होते. त्यामुळे बेलिफामार्फत लेंडवे यांनी संचालकांची खुर्चीसह अन्य साहित्य जप्त केले आहे. ‘‘वाढीव रकमेचा धनादेश राष्ट्रीय महामार्ग विभागाने देण्यास टाळाटाळ केल्याने साहित्याची जप्ती करण्यात आली. साहित्य न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे,’’ असे अॅड. गौरव पोतनीस यांनी संगितले. दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी सकाळ प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा पर्यंत केला पण संपर्क झाला नाही.

शेतकरी सीमा लेंडवे यांच्या प्रमाणेच अजूनही काही शेतकऱ्यांच्या बाबतीत न्यायालयाने आदेश देऊनही महामार्ग विभागाने शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही ही बाब गंभीर आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना शेतकऱ्यांसह मी भेटणार आहे.
दिलीप मेदगे, अभियंता, समन्वयक, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com