Chilli Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Chili Rate : आवक घटल्याने मिरचीचे दर वधारले

Chili Market : उन्हाचा पारा वाढलेला असतानाच लाल मिरची खरेदीसाठी ग्राहकांची मोठी लगबग बाजारात पाहावयास मिळत आहे.

Team Agrowon

वाशी ः उन्हाचा पारा वाढलेला असतानाच लाल मिरची खरेदीसाठी ग्राहकांची मोठी लगबग बाजारात पाहावयास मिळत आहे. घरगुती तिखट तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला मोठी मागणी आहे; मात्र अवकाळी पावसाने आवक कमी झाल्याने चाळीस दिवसांत लवंगी, गुंटूर, चपाटाचे भाव वधारले आहेत.

लाल तिखट असो की विविध प्रकारचे तयार मसाले बाजारात, किराणा दुकानांत उपलब्ध आहेत; मात्र असे असतानाही उन्हाळा सुरू होताच वर्षभर पुरेल इतका लाल तिखट, घरगुती मसाला तयार करून घेण्यावर अनेकांचा भर असतो. चांगल्या प्रकारे वाळलेली लाल मिरचीची आवक जानेवारीपासून बाजारात उपलब्ध झाली आहे.

स्थानिक भागासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातून लाल मिरचीची प्रामुख्याने आवक होते; मात्र यंदा स्थानिक भागांबरोबरच तेलंगणातूनदेखील दरवर्षीच्या तुलनेत आवक कमीच होत आहे. परिणामी, लाल मिरचीचे भावही वाढले आहेत.

त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात दाखल झालेल्या बेडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, रसगुल्ला, काश्मिरी, संकेश्वरीसह तिखट लवंगी मिरचीच्या दरात ८ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GMO Indian Rice : चीनने भारताचा तांदूळ परत पाठवला; तांदळात जीएमओ असल्याचा आरोप

Water Level Drops: गिरणा धरणातील जलसाठा घटू लागला

Agrowon Podcast: मका भाव दबावातच; सोयाबीनची आवक मंदावली, कापूस आवक स्थिर, गहू आवक सुधारली तर तूर दर स्थिर

Grape Farmers Loss: द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, नैसर्गिक आपत्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील ७५ टक्के क्षेत्र बाधित

School Nutrition Banana Supply: पोषण आहारात केळीचा पुरवठा अल्पच

SCROLL FOR NEXT