Animal Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Disease : कासेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपचार

Animal Health : पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या विविध आजारांमधील एक आजार म्हणजे कासदाह. सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव किंवा सडाला झालेल्या संसर्गामुळे कासेचा आजार वाढतो.

Team Agrowon

डॉ. प्रज्योत दखने

Animal Care : पावसाळा सुरू झाला, की जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव सुरू होतो. वातावरणातील ओलावा वाढल्याने जिवाणूंची संख्या वाढत असते. पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या विविध आजारांमधील एक आजार म्हणजे कासदाह. सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव किंवा सडाला झालेल्या संसर्गामुळे कासेचा आजार वाढतो. कासदाह आजारामुळे जनावर दूध देणे बंद होते. दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींमध्ये आजाराचे प्रमाण जास्त असते.

कारणे

जिवाणू तसेच बुरशीजन्य घटकांच्या प्रादुर्भावामुळे कासदाह होतो. याचबरोबरीने शारीरिक इजा, अस्वच्छतेमुळे देखील कासदाह होतो.

लक्षणे

सड आणि कास सुजते. सड गरम लागतात. सडाला स्पर्श केल्याने वेदना होतात, अस्वस्थता वाढते. दूध काढू नये म्हणून जनावरे लाथा मारतात.

दुधामध्ये रक्ताच्या गुठळ्या, दुर्गंधीयुक्त तपकिरी स्त्राव दिसतो. दुधाचे उत्पादन पूर्णपणे थांबते.

जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. भूक लागत नाही. कासेची सूज आणि वेदनांमुळे हालचाल करण्यात अडथळा येतो.

पचनाचे विकार आणि अतिसाराची लक्षणे दिसतात.

प्रतिबंध

कॅलिफोर्निया कासदाह चाचणी करावी. लवकर केलेल्या तपासणीमुळे आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते. गाई,म्हशी तसेच गोठ्याची स्वच्छता ठेवावी. सड स्वच्छ ठेवावेत. स्वच्छतेसाठी वेगवेगळे कापड किंवा कागदी टॉवेल वापरावा.

दूध काढण्यापूर्वी सड, कास पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी करावी. दूध काढल्यानंतर जंतुनाशक टीट डिप्स वापरावेत.

दूध काढल्यानंतर गायींना खाद्य द्यावे, जेणेकरून त्या लगेच गोठ्यात बसणार नाहीत. यामुळे सडामध्ये सूक्ष्मजीवांचा प्रवेश होत नाही.

उपचार

कासदाह आढळल्यानंतर प्रथमोपचार म्हणजे कासेच्या पृष्ठभागावर बर्फाचे तुकडे लावावेत. प्रादुर्भाव झालेल्या सडांचे संक्रमित दूध दिवसातून तीन वेळा बाहेर काढावे. त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावावी.

दूध काढताना प्रथम निरोगी, संसर्ग नसलेली गाय, म्हशींचे दूध काढावे. त्यानंतर संसर्ग झालेल्या गाई,म्हशींचे दूध काढून ते नष्ट करावे.

पशूवैद्यकाच्या सल्याने तातडीने उपचार सुरू करावेत.

डॉ. प्रज्योत दखने, ७९७२७९११६२

(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT