Animal Disease : जनावरांमधील सडांचा आजार ; असा करा प्रतिबंधात्मक उपाय

Team Agrowon

जनावरांचे आजार

पावसाळा सुरू झाला की, वातावरणातील बदलांमुळे जनावरांना विविध रोगांची लागण होते. वातावरणात वाढलेल्या ओलाव्यामुळे जनावरांना आजारांचा संसर्ग होतो.

Animal Disease | Agrowon

कासदाह

पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या आजारांपैकी एक म्हणजे कासदाह किंवा सडांचा आजार. गायी-म्हशींमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

Animal Disease | Agrowon

दूध उत्पादन

या आजारामुळे जनावर दूध देत नाही. परिणामी दूध उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.

Animal Disease | Agrowon

जीवाणूंचा प्रादुर्भाव

जीवाणू तसेच बुरशीजन्य घटकांच्या प्रादुर्भावामुळे कासदाह होतो. तसेच शारीरिक इजा आणि अस्वच्छतेमुळेही कासदाह होतो.

Animal Disease | Agrowon

कास सुजते

कासदाह झालेल्या जनावराचे सड आणि कास सुजते. सडाला स्पर्श केल्यानंतर जनावराला वेदना होतात. दूध काढू नये म्हणून जनावर लाथा मारते.

Animal Disease | Agrowon

कॅलिफोर्निया चाचणी

कासदाह आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जनावराची कॅलिफोर्निया चाचणी करावी. लवकर चाचणी केल्याने आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते.

Animal Disease | Agrowon

गोठ्याची स्वच्छता

गायी-म्हशींच्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी. सड स्वच्छ ठेवावेत. स्वच्छतेसाठी वेगळे कापड किंवा कागदी टॉवेल वापरावा.

Animal Disease | Agrowon

संक्रमित सड

कासदाह आढळल्यानंतर कासेवर बर्फाच्या तुकड्याने शेक द्यावा. संक्रमित सडाचे दूध दिवसातून तीनवेळा बाहेर काढावे.

Animal Disease | Agrowon

उपचार करावेत

तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास त्वरीत पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.

Animal Disease | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....