Snake Agrowon
ॲग्रो विशेष

Snake Bite Awareness : सर्पदंश बाधित शेतकऱ्यांना उपचार, मदतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करा

Dr. Amol Kolhe : खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीवर वन विभागाच्या महासंचालकांची राज्य सरकारला सूचना

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांना उपचार आणि प्रसंगी मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत कशी देता येईल, याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या सूचना केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल यांनी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिल्या आहेत.

याबाबत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन, निवेदन देत संबधित विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. याबाबत डॉ. कोल्हे म्हणाले, की शिरूर लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांमध्ये घोणस व इतर सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना, विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेकदा रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते.

अशा वेळी शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ले आणि सर्पदंश केल्याच्या अनेक घटना घडतात. बिबट हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना वन विभागाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येत असली तरी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची कोणतीही तरतूद नाही. आधीच असंख्य अडचणींनी घेरलेल्या शेतकऱ्यांना सर्पदंशाने आलेले आर्थिक संकट मी जवळून बघितले आहे.

म्हणूनच बिबट हल्ल्याप्रमाणेच सर्पदंश झालेल्या व्यक्तींनाही आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी मी अनेकदा केली होती. या विषयाचे गांभीर्य ओळखून केंद्रीय वन विभागाने सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे, तसेच सर्पदंशापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत, असेही कोल्हे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT