Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीककर्ज वितरणाची तयारी सुरू

Rabi Season : खरिपातील पीककर्ज वितरण खानदेशात ८४ टक्केही झालेले नाही. रब्बीसाठी पीककर्ज वितरण काही बँकांत सुरू झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खरिपातील पीककर्ज वितरण खानदेशात ८४ टक्केही झालेले नाही. रब्बीसाठी पीककर्ज वितरण काही बँकांत सुरू झाले आहे. तसेच काही बँकांनी कर्ज वितरणासाठी प्रस्ताव, अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

खरिपात खानदेशात सुमारे तीन हजार कोटी रुपये पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक होता. रब्बीतील कर्ज वितरण लक्ष्यांक खरिपाच्या तुलनेत निम्माही नाही. जळगाव जिल्ह्यात सुमारे ६०० कोटी, धुळ्यात १२० कोटी, नंदुरबारात सुमारे ९० कोटी रुपये पीककर्ज वितरण रब्बी हंगामात अपेक्षित आहे.

धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेला रब्बी हंगामात पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक देण्यात आलेला नाही. जळगाव जिल्हा बँकेला रब्बीत पीककर्ज वितरण करायचे आहे. तसेच धुळे, नंदुरबार व जळगावांत सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांना रब्बीसाठी पीककर्ज वितरण करायचे आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांनी रब्बीसंबंधी पीककर्ज वितरण या आठवड्यात सुरू केले आहे. तसेच नवे अर्ज स्वीकारण्यासही सुरुवात केली आहे. नव्याने पीककर्ज देण्यासंबंधी शेतकऱ्यांचे बँक खातेही या बँकांनी उघडण्यास अनेक भागात मंजुरी दिली आहे. खरिपात पीककर्ज वितरण कमी झाल्याने अनेक बँका रब्बीमध्ये पीककर्ज वितरणासंबंधी कार्यवाही करीत आहेत.

जळगाव जिल्हा बँकेच्या काही मोठ्या सोसायट्यांमध्ये रब्बीसाठी पीककर्ज वितरण केले जाते. या सोसायट्यांमध्ये पीककर्ज वितरणासंबंधी शेतकऱ्यांना प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात पीककर्ज प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे.

दसरा सणापूर्वी अनेक बँका पीककर्ज वितरणास गती देतील, असेही चित्र खानदेशात आहे. अद्याप रब्बीमधील लक्ष्यांकाच्या तुलनेत दोन टक्केही पीककर्ज वितरण झालेले नाही. परंतु रब्बीमध्ये सोयाबीन, मका, ज्वारी आदी हंगाम शेतकऱ्यांच्या हाती येत आहे. कापूस पीकही बऱ्या स्थितीत अनेक भागात आहे. यामुळे बँकाही नवे प्रस्ताव स्वीकारणे व इतर कार्यवाहीसाठी तयार झाल्याचे दिसत आहे.

प्रशासनाचा आढावा केव्हा?

खरिपातील पीककर्ज वाटप कमी झाले. याबाबतही जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासन, बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सूचना दिलेल्या नाहीत. आता रब्बी हंगाम अधिकृतपणे सुरू झाला आहे.

पण अद्यापही बँका, प्रशासनासोबतची आढावा बैठक झालेली नाही. ही बैठक झाल्यास पीककर्ज वितरण व इतर वित्तीय विषय मार्गी लागण्यास मदत होते, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ammonium Sulphate : केंद्र सरकार देणार अमोनियम सल्फेटवर अनुदान; युरियाच्या टंचाईमुळे निर्णय

Crop Loss compensation GR: परभणी, हिंगोलीतील शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदीसाठी ८३६.३९ कोटी निधी वितरणास मंजुरी

Sugarcane Cultivation: परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत ७ हजार ८०९ हेक्टरने वाढ

Unseasonal Rain Paddy Crop Damage: अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान

Paddy Crop Damage: बळीराजाला आर्थिक चणचण

SCROLL FOR NEXT