Bull Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

शेतीच्या मशागतीसाठी यंदा बैलांना प्राधान्य

इंधन दरवाढीने खर्च वाढला; खरीपपूर्व मशागत सुरू

टीम ॲग्रोवन

शहरटाकळी, ता. नगर ः रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. खरीप हंगामाचा कालावधी जवळ आला आहे. मात्र यंदा इंधन दरवाढीने शेतीकामाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी बैलांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामाच्या तयारीला नगर जिल्ह्यात वेग आला आहे. शेतातील नांगरणी, वखरणी, सरी, रोटा मारणे अशा विविध कामांत शेतकरी गुंतून गेले आहेत. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने परिसरातील शेतकरी वर्षांतून दोन पिके घेऊ लागला आहे. त्यामुळे शेतातील ऊस, कांदा उत्पादनाचा आलेख उंचावला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे शेतामधील माल कमी दराने विकण्याची वेळ आली. त्यामुळे बळिराजाच्या आर्थिक संकटांमध्ये वाढ झाली होती. अशा परिस्थितीमध्ये शेतीसाठी आर्थिक नियोजन कसे करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

या वर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे शेतीची कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने केली जातात. शेती व्यवसायातही यांत्रिकीकरण झाले. मात्र इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्‍यांना बसत आहे. शेतीच्या सर्वच कामांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी यंदा बैलाच्या साह्याने शेतीकामाला प्राधान्य देत आहेत.

डिझेलचे दर वाढतच आहेत. वाहनांसह शेतमशागतीसाठी डिझेलचा वापर अधिक होतो. चालकांची मजुरी व ट्रॅक्टरचा घसाराही विचारात घ्यावा लागतो.
- सोमनाथ सामृत, ट्रॅक्टरमालक, मठाची वाडी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT