Sugarcane Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : पूर्वहंगामी उसाच्या लागवडी खोळंबल्या

Sugarcane Farming : उसाच्या आगारात आत्तापर्यंत आडसाली, पूर्व हंगामी उसाच्या अवघ्या १ लाख ९ हजार ३९ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या नियोजनात अडचणी येत आहेत. पुरेशा पावसाअभावी पुणे विभागात पूर्व हंगामी ऊस लागवडी खोळंबल्याचे चित्र आहे. उसाच्या आगारात आत्तापर्यंत आडसाली, पूर्व हंगामी उसाच्या अवघ्या १ लाख ९ हजार ३९ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. त्यातच ऑक्टोबर पडलेल्या कडक उन्हामुळे जमिनीत पुरेशी ओल नसल्याने ऊस लागवडीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

यंदा पुणे जिल्ह्याच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाने चांगली हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील पानशेत, पवना, कळमोडी, चासकमान, नीरा देवघर अशी काही धरणे शंभर टक्के भरली. मात्र, उजनीत पुरेसा पाणीसाठा झालेला नाही.

नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण भरले असले तरी मुळा धरणांत ८० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. परंतु इतर धरणांत पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी जलसंपदा विभाग पुढाकार घेत आहे.

आडसाली उसाच्या लागवडीचा हंगाम संपून पूर्वहंगामी व सुरू उसाच्या लागवडी सुरू होतील. यंदा एक ते २४ जून, त्यानंतर १ ते १८ जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाएैवजी सोयाबीन, मूग, मका या पिकांवर भर दिला आहे. त्यामुळे ऊस लागवडीत घट झाल्याचे चित्र आहे. चांगला पाऊस झाल्यास दरवर्षी याच काळात एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवडी होतात. मात्र कमी पावसामुळे उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे.

पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी तीन लाख ६१ हजार ५३८ हेक्टर क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, संगमनेर, राहाता तालुक्यांत बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत लागवडी झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, माढा या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या असल्या तरी विभागात ऊस लागवडीचे प्रमाण कमी आहे.

जिल्हानिहाय आडसाली ऊस लागवड (हेक्टरमध्ये)

जिल्हा---सरासरी क्षेत्र---आडसाली, पूर्व हंगामी

नगर---९४,६९३---३१४४०

पुणे---१,३५,२१७---५२८१२

सोलापूर---१,३१,६२८---२५६३२

एकूण---३,६१,२३८---१,०९,८८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21 Installment : पीएम किसानच्या २१ हप्त्याची हप्त्याची तारीख ठरली; नोंदणीसाठी कृषी मंत्रालयाचे आवाहन

Sugarcane Rate Protest: कर्नाटकातील मुधोळमध्ये ऊसदर आंदोलनाचा भडका

Micro Irrigation: ‘सूक्ष्म सिंचन’साठी इंदापुरात मोहीम

Crop Processing Industry: पारंपरिक शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा: पाटील

Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय लाडक्या बहि‍णींना

SCROLL FOR NEXT