Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : मॉन्सूनपूर्व कामांची रखडपट्टी

Rain Update : पावसाळा जरी लांबणीवर गेला, तरी पावसाळी कामे अपूर्णच आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला.

Team Agrowon

Vasai News : वसई-विरार महापालिका शहराच्या सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र शहराला अनेक समस्यांनी विळखा घातल्याचे दिसून येत आहे. पावसाळा जरी लांबणीवर गेला, तरी पावसाळी कामे अपूर्णच आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला.

वसई-विरार शहरात नालेसफाई, गटार सफाई, जुन्या गटारांची दुरुस्ती, रस्ता डांबरीकरण आणि नवीन गटारांची उभारणी यासह अन्य कामे हाती घेतली आहेत; परंतु अनेक ठिकाणी गटारे उघडीच आहेत.

तसेच ज्या ठिकाणी काम सुरू आहे, तिथे लोखंडी सळ्या बाहेर आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठांसह सर्वसामान्य नागरिक यांचा तोल गेल्यास दुर्घटना होऊ शकते. याठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

तसेच गटार, नालेसफाई करताना निघालेला गाळ, कचरा हा बाजूलाच टाकून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व घाणीचा सामना करावा लागत आहे. डासांची पैदास होऊन आजार उद्भवू शकतो, याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

मूलभूत समस्या कायम

वसई-विरार शहरात नागरिकांना अनेक मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पाणीपुरवठा वेळेत होत नाही. रस्त्यांचा अभाव, वाहतूक कोंडी आणि कचऱ्याची समस्या आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या गटारांचे काम अपूर्ण आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेने पावसाळ्यापूर्वी विकासकामे करताना लक्ष देणे गरजेचे आहे. गटाराचा स्लॅब टाकताना लोखंडी सळ्या बाहेर असतात. अंधाराच्या वेळेस दुर्घटना घडू शकते.
मनीष बारोडिया, नागरिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT