Latur district Rain agrowon
ॲग्रो विशेष

Latur district Rain : मॉन्सूनपूर्व पावसाचा लातूर जिल्ह्यात कहर

Latur Rain : लातूर जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने कहर केला असून फळबागांसह भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Latur : लातूर जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने कहर केला असून फळबागांसह भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. सोमवारी (ता. २६) गोताळा (ता. अहमदपूर) येथे वीज पडून दोघांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले. दुसऱ्या घटनेत तिरुका (ता. जळकोट) येथे वीज पडून एक म्हैस मृत्युमुखी पडली. पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा व काढणीस आलेले टरबुजही पावसाच्या कचाट्यात सापडले असून दगडवाडी येथील शेतकरी उत्तम खुंडे यांचा चार एकरमधील कांद्याचा पावसामुळे चिखल झाला.

दहा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस पडत आहे. सोमवारी दुपारपासून पावसाने सुरुवात केली. यात गोताळा शिवारात उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा काढणारे शेतकरी व मजूर एका झाडाखाली थांबले होते. त्यांच्यावर अचानक वीज कोसळली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यात विक्रम सोपान कारले (वय ५५) व रंजनाबाई बबन समुधाय (वय ५५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर महेश कारले (वय ३०), अनिता कांबळे (वय २०), कविता कारले (वय २६), महानंदाबाई सूर्यवंशी (वय ५२), वालिका कांबळे (वय ३५) व आरती जाधव (वय २१, सर्व रा. गोताळा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदूपर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या घटनेत तिरुका येथील मारुती एकनाथ वाघमारे यांची एक म्हैस सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वीज पडून मृत्युमुखी पडली.

पावसामुळे सर्वाधिक फटका कांद्यासह भाजीपाला पिके व फळबागांना बसला आहे. दगडवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. साठवून ठेवलेल्या कांद्यात पावसाचे पाणी शिरल्याने तो जागेवरच नासला.

धाराशिव जिल्ह्यातही पाऊस

सोमवारी धाराशिव जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले. यात सर्वाधिक पाऊस उमरगा व लोहारा तालुक्यात पडला. धाराशिव शहरातही पावसाने सायंकाळी हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळित झाले. दरम्यान पहिल्याच पावसात घाईने उद्‍घाटन केलेल्या धाराशिव बसस्थानकाला गळती लागल्याने प्रवाशांची हेळसांड झाली. अचलेर (ता. लोहारा) येथे सलग पाच तास पाऊस झाला. उमरगा शहरातील काही वस्त्यांमुळे पावसाचे पाणी शिरले. हवामान विभागाने रात्री पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT