Rain Update Agrown
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस

Rain Update : राज्यात उन्हाचा कडाका सुरू असताना मागील तीन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह कमीअधिक प्रमाणात हजेरी लावली.

Team Agrowon

Pune News : राज्यात उन्हाचा कडाका सुरू असताना मागील तीन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह कमीअधिक प्रमाणात हजेरी लावली. उन्हामुळे अंगाची लाही लाही होतेय, शेतीपिके करपत आहेत. अशा स्थितीत हा पाऊस दिलासादायक ठरणारा आहे. राज्यात पुणे, नगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, कोल्हापूर जिल्ह्यांत पूर्वमोसमी पाऊस शुक्रवारी (ता. १०) झाला. तर सांगलीत ढगाळ वातावरण होते.

दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा, भाजीपाला, वेलवर्गीय भाजीपाला, केळी, टरबूज, काकडी, संत्रा, ज्वारी, बाजरी पिकांना फटका बसला. कांदा भिजू नये यासाठी तो झाकण्याची शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. या पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वादळामुळे विजेच्या ताराही रस्त्यावर लोंबकळत होत्या. तर अनेक ठिकाणी झाडे झाडे उन्मळून पडली. बाजरी पिकाचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले. तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडाकडाटात पाऊस झाला. तसेच तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे, घरे पडझडीच्या घटना घडल्या.

नाशिक जिल्ह्यात वादळासह पाऊस

वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने कसमादे भागातील सटाणा व मालेगाव तालुक्यांत हजेरी लावली. त्यामुळे भाजीपाला व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नामपूर, आसखेडा, ब्राह्मणपाडे, जायखेडा, परिसरासह मोसम खोऱ्यात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी चारच्या सुमारास वादळासह झालेल्या मध्यम ते हलक्या पावसाने भाजीपाला, आंबा, उत्पादक शेतकऱ्यांची दैना केली. नामपूर-ताहाराबाद राज्यमार्गालगत अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा आला.

नगर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी (ता.९) संगमनेर, पारनेर, कोपरगाव तालुक्यांतील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. शहरातील छोटे दुकानदार व व्यापाऱ्यांचीही धांदल उडाली, तर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

हातकणंगले, कागलामध्ये पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, कागल तालुक्यामध्ये शुक्रवारी (ता. १०) सुमारे अर्धा ते एक तास जोरदार पाऊस झाला. दुपारी दोनच्या दरम्यान या तालुक्यात अनेक गावांना पावसाने झोडपून काढले.

फुलंब्रीत भिंत पडून एकाचा मृत्यू

फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे वादळी वाऱ्याने पत्रे पडून पत्र्यावर भिंत पडली. त्यामुळे प्रल्हाद दलसिंग बारवाल (रा. कन्होरी) यांचा मृत्यू झाला. गल्लेबोरगाव येथे जोरदार, तर आडूळ येथे रिमझिम पाऊस झाला. अंबड, किनगाव परिसरात पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT