Bogus Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed : बोगस बियाण्यांवर कृषी विभागाची नजर

Kharif Season 2025 : खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी जिल्ह्यात बोगस बियाणे येत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी जिल्ह्यात बोगस बियाणे येत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. आतापासूनच संबंधित भागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, जिल्ह्यात १७ पथकेही कार्यान्वित केली जाणार आहेत.

जिल्ह्याच्या लगत असलेल्या राज्यातून अप्रमाणित व बोगस ‘बीजी-थ्री’चा शिरकाव दरवर्षीच होतो. बोंड अळीच्या प्रादुर्भावानंतर जिल्ह्यात सर्रासपणे अप्रमाणित बियाणे येत असल्याचे समोर आले. यावर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. बोगस बियाण्यांचा शिरकाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.

यंदा कर्मचाऱ्यांना आतापासूनच बोगस बियाण्यांचा मागोवा घेण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहे. यासाठी १७ पथके तयार करून त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे येतात. हा दरवर्षीचाच प्रकार आहे. यामुळे कृषी विभागाने अप्रमाणित बियाण्यांविरोधात मोहीम उघडली आहे. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी छापे टाकून बियाणे जप्त करण्यात आले.

असे असले तरी आवक कमी झालेली नाही. यंदाही जिल्ह्यात अप्रमाणित बियाण्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम सुरू होण्यासाठी दोन महिने शिल्लक आहेत. आतापासूनच कृषी विभाग ‘अ‍ॅक्टिव्ह’ होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यंदा शोधमोहीम राबविण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे. खरीप हंगामात परराज्यांतून येणाऱ्या या चोर बियाण्यांच्या उलाढालीवर लक्ष ठेवून नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

‘टीप’ घेण्याचा प्रयत्न

अप्रमाणित बियाणे छुप्या पद्धतीने जिल्ह्यात येतात. त्या मार्गावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. आतापासूनच ‘टीप’ घेण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे.

अप्रमाणित बियाण्याविरोधात मोहीम सुरू राहणार आहे. पथके लवकरच कार्यान्वित होणार आहेत. अप्रमाणित बियाणे आढळून आल्यास कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी.
- प्रवीण जाधव, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

Vice President Election 2025 : सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मते फुटली

Hivare Bazar Village: हिवरे बाजारला ‘जल समृद्ध गाव’ पुरस्कार

Cotton Cultivation: पुणे जिल्ह्यात कापूस लागवडीत होतेय वाढ

Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती

SCROLL FOR NEXT