Goat Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Farming : साताऱ्यातील खडकी येथील प्रशांत शिंगटे यांनी उत्तम केलंय शेळीपालन

Turmeric Cultivation : सातारा जिल्ह्यातील खडकी (ता. वाई) येथील प्रशांत भिकू शिंगटे यांच्या कुटुंबाची ४० एकर शेती आहे. संपूर्ण शेती बागायती असून त्यात सर्वाधिक क्षेत्रावर ऊस व हळद लागवड केली जाते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई-म्हैसपालन आणि त्यासोबतच एका उस्मानाबादी शेळीचे संगोपन करत होते.

Team Agrowon

शेतकरी - प्रशांत भिकू शिंगटे

गाव - खडकी, ता. वाई, जि. सातारा.

एकूण शेळ्या - ४०

शेळ्यांची जात - उस्मानाबादी

Goat Farming Update : सातारा जिल्ह्यातील खडकी (ता. वाई) येथील प्रशांत भिकू शिंगटे यांच्या कुटुंबाची ४० एकर शेती आहे. संपूर्ण शेती बागायती असून त्यात सर्वाधिक क्षेत्रावर ऊस व हळद लागवड केली जाते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई-म्हैसपालन आणि त्यासोबतच एका उस्मानाबादी शेळीचे संगोपन करत होते.

उस्मानाबादी शेळीचे संगोपन आणि अर्थकारण योग्य वाटले. त्यामुळे त्यांनी गोठ्यातील जनावरांची संख्या कमी करून पूर्णपणे उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. मागील १२ वर्षांपासून ते शेळीपालन करत आहेत.

शेळीपासून मिळालेल्या पिल्लांचे संगोपन करून टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवीत नेली. एका शेळीपासून सुरु केलेला च व्यवसाय आज लहान-मोठ्या मिळून ४० शेळ्यांपर्यंत पोचला आहे. या व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्यांची त्यांना मिळत असल्याचे प्रशांत सांगतात.

गोठा व्यवस्थापन

- जनावरांच्या जुन्या गोठ्याच्या लगत कमी खर्चात १२ बाय ८० फूट आकाराचा हवेशीर रचना असलेल्या शेडची उभारणी केली.

- सध्या मुक्त संचार व बंदिस्त पद्धतीने शेळ्यांचे संगोपन केले जाते.

- शेडमध्ये लहान पिल्ले, बोकड आणि मोठ्या शेळ्या अशी विभागणी केली आहे. त्यासाठी साधारण चार विभाग केले आहेत.

- शेडमध्ये लहान मोठ्या मिळून ४० शेळ्या आणि पैदाशीकरिता १ बोकड आहे.

- शेळ्यांना मुक्त संचार करता यावा यासाठी पुरेशी जागा उपलब्ध केली आहे.

- गोठ्यात एकही शेळी विकत घेतलेली नसून आधीच्या शेळ्यांच्या माध्यमातून संख्या वाढवत नेली आहे.

व्यवस्थापनातील बाबी

- शेळीपालन करताना प्रत्येक बाबीचे काटेकोर नियोजन करणे आवश्‍यक असते.

- शेळ्यांच्या अपेक्षित वाढीसाठी संतुलित खाद्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे नियोजन केले जाते.

- सुक्या चाऱ्यात कडबा, सोयाबीन भुसकट, तर ओल्या चाऱ्यामध्ये मका, सुपर नेपियरचा वापर केला जातो.

- दररोज सकाळी शेळ्यांना बंदिस्त शेडमधून बाहेर काढून मुक्त संचार शेडमध्ये शेळ्या सोडल्या जातात. ले जाते. त्यानंतर शेडची स्वच्छ केली जाते

- शेळ्यांचे सर्व दूध पिलांना पिऊ दिले जाते.

- गाभण शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. त्यांच्या खाद्य, पाणी आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.

- करडांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या गळ्यात वेगवेगळ्या रंगाचे धागे बांधले आहेत. जेणेकरून वय, लसीकरण आणि खाद्य व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येईल.

- काही वेळा लहान करडांमध्ये कॅल्शिअमची कमतरता दिसून येते. त्यासाठी शेडमध्ये कॅल्शिअम विटा चाटण्यासाठी ठेवल्या जातात.

हवामानानुसार व्यवस्थापन

- ऋतुनुसार शेळ्यांच्या व्यवस्थापन पद्धतीत वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल केले जातात. जेणेकरून हवामान बदलाच्या त्यांच्यावर परिणाम होऊ नये.

- थंडीच्या काळात पिल्लांना उबदार वातावरणात ठेवले जाते. तसेच वजन आणि वय यानुसार दूध पाजले जाते.

- पावसाळ्यात शेड स्वच्छ व कोरडा ठेवण्यावर भर दिला जातो.

- उन्हाळ्यात गोठा हवेशीर राहील याची काळजी घेतली जाते.

आरोग्य व्यवस्थापन

- शेळ्या आणि बोकडांना वर्षभर वेगवेगळे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे शेळ्या आजारास बळी पडण्याची प्रमाण कमी होते.

- अडीच महिन्यातून एकदा जंतनाशकाची मात्रा दिली जाते.

- लसीकरण केल्यानंतर किमान ४ तास शेळीला कोणताही चारा दिला जात नाही.

- आजारी शेळ्या आणि पिलांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. आवश्यकतेनुसार पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार केले जातात.

विक्री नियोजन

मागील १२ वर्षांच्या शेळीपालनातील अनुभवातून शेळीपालनातील सर्व कामांचे नियोजन करणे सोपस्कर झाले आहे. फार्ममध्ये वर्षभर खरेदी विक्री सुरू राहते. शेडमधील

शेळ्यांची विक्री केली जात नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार फक्त बोकडांची विक्री केली जाते. वर्षाला साधारण ५० ते ५५ नगांपर्यंत विक्री होते. बोकडास प्रति किलो ३५० ते ४५० रुपये दर मिळतो. विशेषतः थेट विक्रीवर भर दिला जातो. सण-समारंभ, यात्रा, उत्सव या काळात बोकडांना विशेष मागणी असते. त्यासाठी आधीच नियोजन करून काही बोकडांचे स्वतंत्र संगोपन केले जाते.

संपर्क - प्रशांत शिंगटे, ७५८८६३६५२२ (शब्दांकन - विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT