Bacchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी ‘प्रहार’चे मशाल आंदोलन

Farmer Protest: राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी मशाल आंदोलन जाहीर केले आहे.

Team Agrowon

Amravati News: कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घुमजाव करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटविण्याचा इशारा माजी आमदार तसेच प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी (ता. ११) रात्री १२ वाजता राज्यातील प्रत्येक आमदाराच्या घरासमोर मशाल आंदोलन केले जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान करीत सत्तेत बसविले. आता मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या तीन वर्षांत तरी कर्जमाफी शक्‍य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याचे आवाहन केले. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याचीच दखल घेत बच्चू कडू यांनी याविरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकण्याचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येत्या काळात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी (ता. ११) रात्री बारा वाजता आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवीत आंदोलन केले जाणार आहे. त्याबरोबरच उत्पादकता खर्च कमी व्हावा याकरिता शेती कामांचा समावेश रोजगार हमी योजनेअंतर्गत केला जावा, अशी जुनीच मागणी आहे. या मागणीची पूर्तता झाली पाहिजे, याकरिता देखील आंदोलनाचा मार्ग पत्करला जाणार असल्याचे कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा वापर मतांपुरताच होतो हे यावरून पुन्हा एकदा राज्यकर्त्यांनी सिद्ध केल्याचेही ते म्हणाले.

पक्षनेत्यांची घेतली बैठक

प्रहार जनशक्‍ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, नेते तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे प्रमुख व तालुका प्रमुख यांची गुढीपाडव्याला बच्चू कडू यांनी बैठक घेतली. पक्ष संघटना वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना त्याबरोबरच आंदोलनाबाबत या वेळी चर्चा झाली.

कर्जमाफीचे आश्‍वासन देत महायुती सत्तेत आली. आता शेतकऱ्यांना निधी नसल्याचे कारण सांगत कर्जमाफी टाळली जात आहे. शेतकऱ्यांचा हा विश्‍वासघात असल्याने या विरोधात प्रहार जनशक्‍ती पक्षाकडून मशाल आंदोलनाचा मार्ग पत्करला जाणार आहे.
ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्‍ती पक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT