Poultry Business agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

Sangli District : कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या दरात होत असलेल्या चढउतारामुळे खानापूर तालुक्यात शेतीपूरक असणारा पोल्ट्री व्यवसाय सध्या डबघाईला आला आहे.

sandeep Shirguppe

Poultry Business Sangli : सांगली जिल्ह्यात शेतीला जोड धंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय जोरदार केला जातोय परंतु कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या मक्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने धान्याचे दर वाढले आहेत. यामुळे भांडवलाअभावी अंड्यावरील कोंबड्याची पिल्ले पोल्ट्रीधारकांनी खरेदी केली नाहीत. परिणामी दररोजचे तीन लाख अंडी उत्पादन घटले आहे. भांडवलाअभावी खानापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात येत असल्याची खंत पोल्ट्रीधारक व्यक्त करत आहेत.

सतत अंडी दरात होणारी घसरण, कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या दरात होत असलेल्या चढउतारामुळे खानापूर तालुक्यात शेतीपूरक असणारा पोल्ट्री व्यवसाय सध्या डबघाईला आला आहे. श्रावण महिन्यात अंड्याला दर मिळाला नाही. खानापूर तालुका व विटा शहर परिसरात जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत अठरा ते एकोणीस लाख अंड्यांवरील कोंबड्या होत्या. आता त्यात घट होवून चौदा लाख अंड्यावरील कोंबड्या आहेत.

सध्या दररोज बारा लाख अंड्याचे उत्पादन होत आहे. कोंबड्यात घट झाल्याने दररोज तीन लाख अंडी उत्पादन घटले आहे. कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी मका लागतो. मात्र मक्याच्या तुटवड्यामुळे सतत मक्याचे दर कमी-जास्त होत आहेत. बावीस रूपये किलो असणारा मका आता एकतीस रुपये किलो झाला आहे. त्यामुळे कोंबड्याचे खाद्य करण्यासाठी पोल्ट्रीधारकांना कसरत करावी लागत आहे.

कमिशन वजा जाता प्रतिअंडे सहा रुपये हातात मिळणे आवश्यक आहे. मात्र अंड्याच्या दरात होत असलेल्या चढ उतारामुळे सतत आर्थिक नुकसान होत आहे. सध्या भांडवल नसल्याने पोल्ट्री व्यवसाय टिकविण्याचे पोल्ट्रीधारकांना जिकिरीचे झाले आहे.

खानापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँकांची कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय उभारले. मात्र सततच्या आर्थिक नुकसानीने हा व्यवसाय डबघाईला येऊ लागला आहे. काहींनी व्यवसाय बंद केले आहेत. काहींनी तग धरून तो सुरू ठेवला आहे. अंड्याला चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र दर मिळत नाही. व्यवसाय टिकविण्यासाठी कसरत सुरू असल्याची माहिती पोल्ट्रीधारक करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT