Farm Construction Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Construction : शेतातील बांधकाम करमुक्‍त होण्याच्या हालचाली

Tax Free farm Construction : शेतातील बांधकाम ही शेतीच समजण्यात यावी आणि त्यावर कोणत्याच कराची आकारणी करण्यात येऊ नये, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : शेतातील बांधकाम ही शेतीच समजण्यात यावी आणि त्यावर कोणत्याच कराची आकारणी करण्यात येऊ नये, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. त्याची दखल घेत पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्‍नी थेट ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना पत्र लिहीत हा कर रद्द करण्याबाबत उचित कार्यवाहीची विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच शेतातील बांधकाम करमुक्‍त होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पशुसंवर्धन मंत्र्यांच्या पत्रानुसार, राज्यातील शेतकरी पोल्ट्री फार्म या शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांच्या शेतामध्ये पॉलिहाउस, शेडनेट, पोल्ट्री शेडचे बांधकाम करतात. या बांधकामासाठी ग्रामपंचायती कराची आकारणी करतात.

विशेष म्हणजे या बांधकामापोटी ग्रामपंचायतींकडून कोणत्याच प्रकारच्या सुविधा दिल्या जात नसताना हा कर आकारला जातो. त्यामुळे हा कर रद्द करावा, अशी पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आहे.

राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समिती तसेच पोल्ट्री फार्मर्स संघटना यांनी देखील निवेदनाद्वारे हा कर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यासोबतच राज्यातील पशुपालकांनी देखील सरकारवर सातत्याने या प्रश्‍नावर दबावाची भूमिका घेतली आहे.

या साऱ्याच्या परिणामी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना याप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. थेट लिहिलेल्या पत्रातून शेतातील बांधकामावर लावण्यात आलेला कर रद्द करावा, अशी आग्रही भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे लवकरच या प्रश्‍नावर सकारात्मक तोडगा निघत शेतातील बांधकाम करमुक्‍त होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT