Farm Construction : शेतातील बांधकाम ग्रामपंचायत करपात्र नाही

Latest Agriculture News : कर्नाटक राज्याच्या नॉर्थ बंगलुर तालुक्‍यातील सोन्डेकोप्पा ग्रामपचांयतीने त्यांच्या हद्दीतील एका पोल्ट्री व्यवसायिकाला वीजपुरवठ्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास नकार दिला होता.
Agriculture Commodity
Agriculture Commodity Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : शेतीपूरक व्यवसायासाठी शेतीशिवाराच्या परिसरातच शेडची उभारणी केली जाते. त्याकरिता ग्रामपंचायतस्तरावर कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत, मात्र कराची आकारणी होते. याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आदेश देताना ग्रामपंचायतींना अशा करआकारणीचे अधिकारच नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.

कर्नाटक राज्याच्या नॉर्थ बंगलुर तालुक्‍यातील सोन्डेकोप्पा ग्रामपचांयतीने त्यांच्या हद्दीतील एका पोल्ट्री व्यवसायिकाला वीजपुरवठ्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास नकार दिला होता. संबंधित शेतकऱ्याने त्याच्या शेतात पोल्ट्री उभारली होती.

हा व्यवसाय असल्याने ग्रामपंचायत करापोटी त्यांच्याकडे १.३७ लाख रुपये थकित आहेत. याच कारणापायी ‘एनओसी’ नाकारण्यात आली होती. यातील याचिकाकर्ते नागसंद्रा येथील शेतकरी के. नर्सिंमामूर्ती यांच्याकडे चार एकर शेती आहे.

Agriculture Commodity
Poultry Industry In Maharashtra : कुक्‍कुट समन्वय समिती कुचकामी

त्यांनी ग्रामपंचायतीची मागणी लक्षात घेऊन पोल्ट्री व्यवसाय वेळेत सुरू व्हावा यासाठी विजेची गरज लक्षात घेऊन एकूण थकित करापैकी ५९५५१ रुपयांचा भरणा केला. मात्र स्वतःच्या शेतीच्या परिसरात असलेल्या या व्यवसायाकरिता ग्रामपंचायतीकडून कोणत्याच सुविधा मिळत नसताना हा कर अन्यायकारक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करून याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली.

Agriculture Commodity
Poultry Farming : पोल्ट्री शेड करमुक्त करण्यासाठी शासन-प्रशासन सकारात्मक

यावर कर्नाटक शासनाच्यावतीने युक्‍तिवाद करणाऱ्या वकिलाने पोल्ट्री हा व्यवसायिक उपक्रम असल्याने त्याच्याकरिता उभारण्यात आलेले शेड व इतर बांधकाम हे पंचायत राज तरतुदीनुसार व्यवसायीक बांधकाम मानले जाते. परंतु संबंधित शेड्यूल (पाच)मधील तरतुदीनुसार पोल्ट्री फार्मिंग हे व्यवसायिक असल्याबाबतची स्पष्टता होत नाही.

परिणामी, ते करास पात्र नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांनी नोंदविले. त्यानुसार शेतकरी के. नर्सिंमामूर्ती यांची याचिका मान्य करीत त्यांच्याकडून करापोटी घेण्यात आलेली ५९५५१ रुपयांची रक्‍कम परतीचे आदेशही देण्यात आले.

महाराष्ट्रातदेखील स्वतःच्या शिवारात पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अशीच नियमबाह्य करवसुली सुरू आहे. पोल्ट्री, डेअरीसाठी उभारलेल्या शेडवर लाखात खर्च असेल तर तो कोट्यवधी रुपयांत दाखविला जातो. त्याआधारे रेडीरेकनरच्या दरानुसार कर आकारणी केली जाते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाची दखल घेत महाराष्ट्रातदेखील ग्रामपंचायत करातून सूट मिळाली पाहिजे. अन्यथा राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकदेखील या विरोधात न्यायालयात जाणार आहेत.
- शरद गोडांबे, राज्य समन्वयक, पोल्ट्री योद्धा फेडरशेन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com