Papaya Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Cultivation : पपई लागवड वाढण्याची शक्यता

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पपईची लागवड वाढेल. ही लागवड नंदुरबारात सहा हजार हेक्टरपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. लागवडीसाठी यंदा रोपांचा मुबलक पुरवठा होईल, असेही दिसत आहे.

अनेक शेतकरी रोपवाटिकांत रोपांची आगाऊ मागणी नोंदवित आहेत. यंदा पपई रोपांचे दर प्रतिरोप १२ ते १५ रुपये असे आहेत. ७८६ व १५ नंबर या वाणांच्या पपई रोपांची खानदेशात मागणी असते. कमाल शेतकरी ७८६ वाणाच्या पपई रोपांना पसंती देतात. लागवड जानेवारीत सुरू होईल. ही लागवड मार्चपर्यंत केली जाते. अनेक शेतकरी कलिंगड पिकात आंतरपीक म्हणून पपईची लागवड करतात.

पपईचे दर मागील तीन वर्षे टिकून आहेत. मागील वर्षी पपईला सरासरी १३ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला. अनेक शेतकरी एकरी १८ ते २० टन पपईचे उत्पादन साध्य करतात. कापूस, केळीच्या तुलनेत पपई परवडत असल्याने शेतकरी पपई पिकाकडे वळत आहेत. खानदेशात दरवर्षी साडेसात हजार हेक्टरवर पपई असते. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवर पपई असते.

यंदा किंवा २०२४-२५ च्या हंगामात नंदुरबारात पपईची लागवड सहा हजार हेक्टरपेक्षा अधिक राहील. त्यात शहादा (जि.नंदुरबार) तालुक्यात खानदेशात सर्वाधिक साडेपाच हजार हेक्टरवर पपईचे पीक असणार आहे. धुळ्यात सुमारे ११०० हेक्टरवर तर जळगाव जिल्ह्यातही सुमारे दोन हजार हेक्टरवर पपईची लागवड अपेक्षित आहे.

पपई लागवडीसाठी रोपे पुरवठादारांनी रोपांची आगाऊ नोंदणी सुरू केली आहे. जशी नोंदणी होत आहे, तशी रोपे तयार केली जात आहेत. आगाऊ नोंदणीच्या वेळेस रोपांचा निम्मा निधी किंवा खर्च शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे.

जळगाव जिल्ह्यात जामनेर, चोपडा, यावल या भागात पपईची रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिका आहेत. तसेच अनेक शेतकरी धाराशीव, जालना, नंदुरबार या जिल्ह्यातही पपई रोपांची आगाऊ नोंदणी करून घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT