Pomegranate Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Rate : डाळिंब दरात सुधारणा

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Pomegranate Prices : सांगली ः गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी देशातील डाळिंबाच्या बाजारपेठेत गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील डाळिंबाची आवक वाढली होती. त्यामुळे डाळिंबाचे दर दबावात होते.

गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही राज्यांतील डाळिंब आवक कमी झाल्याने डाळिंबाला उठावही चांगला मिळत असल्याने डाळिंबाच्या दरात प्रतिकिलोला १५ ते २० रुपयांनी सुधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशात ५० हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहर शेतकऱ्यांनी साधला आहे. आजअखेर ३० हजार हेक्टरहून अधिक या बहरातील डाळिंबाची विक्री पूर्ण झाली आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील डाळिंब देशातील विविध डाळिंबाच्या बाजारपेठेत विक्रीला आली.

त्यामुळे आवक वाढल्याने डाळिंबाला अपेक्षित उठाव मिळाला नाही. याचा परिणाम डाळिंबाच्या दरावर झाल्याने डाळिंबाचे दर दबावात होते. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांना आर्थिक फटकाही बसला.

दरम्यान, गुजरात आणि राजस्थानमधील डाळिंबाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तर इतर डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यांत डाळिंबाचा हंगाम ६० टक्के आटोपला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून डाळिंबाच्या बाजारपेठेत डाळिंबाची आवकही कमी झाल्याने डाळिंबाच्या दरात प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी सुधारणा झाली आहे. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलोला १०० ते १२५ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


डाळिंबाचे तुलनात्मक दर (रुपये प्रतिकिलो)
नोव्हेंबर २०२३...१५० ते १६०
डिसेंबर २०२३...१३० ते १३५
जानेवारी २०२४ ... ५० ते ८०
जानेवारी २०२४ (ता. २४) ... १०० ते १२५


परराज्यातील डाळिंबाची आवक कमी झाली असल्याने डाळिंबाच्या दरात सुधारणा झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात डाळिंबाच्या दरात १० ते १५ रुपयांनी सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
...
कोट ः
गुजरात, राजस्थान या दोन्ही राज्यातील डाळिंबाची आवक येत्या पंधरा ते वीस दिवसांत पूर्ण कमी होईल. मृग बहर संपत आला असून आगाप हस्त बहरातील डाळिंब फेब्रुवारीमध्ये सुरू होतील. त्यामुळे दरही टिकून राहतील.
- समाधान भोसले, डाळिंब उत्पादक शेतकरी, पापरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT