Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Terwad Pollution : तेरवाड येथे ‘प्रदूषण नियंत्रण’ अधिकाऱ्यांना घेराव

Panchganga River Pollution : पंचगंगा नदीला पुन्हा एकदा रसायनमिश्रित काळेकुट्ट प्रदूषित पाणी आले असून, त्यामुळे तेरवाड बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : पंचगंगा नदीला पुन्हा एकदा रसायनमिश्रित काळेकुट्ट प्रदूषित पाणी आले असून, त्यामुळे तेरवाड बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत. बंधारा परिसरात दुर्गंधी पसरली असून, या परिसरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील हे बुधवारी पाहणी करण्यासाठी आले असता स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या बंडू पाटील व विश्‍वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी अधिकारी पाटील यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा दिला.

आठ-दहा दिवसांपूर्वी पंचगंगा नदीत प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत होण्याचा प्रकार घडला होता. त्याचा विसर पडायच्या आत कालपासून पुन्हा एकदा रसायनमिश्रित काळेकुट्ट पाणी पंचगंगेत आले व शेकडो लहान मोठे मासे तडफडून मृत्युमुखी पडले. प्रदूषित नदीची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता.११) क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील तेरवाड बंधाऱ्यावर आल्यानंतर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला.

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा, कारवाईचा फार्स नको. केवळ पाण्याचे नमुने घेऊन जाऊ नका, तर त्याचा तपासणी अहवाल सार्वजनिक करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. वारंवार अशा प्रकाराच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असून, याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढा, अशी आग्रही मागणी करत विश्‍वास बालिघाटे व बंडू पाटील यांनी अधिकारी पाटील यांना घेराव घातला.

आंदोलनकर्त्यांच्या प्रश्‍नांवर अधिकारी निरुत्तर झाले. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका तसेच औद्योगिक वसाहती यांच्याकडून पंचगंगेत प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याने मासे मृत झाल्याचा आरोप बालिघाटे व पाटील यांनी या वेळी केला. तसेच इचलकरंजी महापालिकेवर कारवाईचा आग्रह धरला.

त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी प्रदूषित पाण्याचा सविस्तर अहवाल प्राप्त करून प्रदूषित घटकांवर त्वरित कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. त्यानंतर मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील यांना सोडण्यात आले. आंदोलनात या परिसरात मासेमारी करून उपजीविका करणाऱ्या कुरूंदवाड, तेरवाड, शिरढोण परिसरातील बांगडी समाज बांधवांनी भाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT