Nagpur News : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षातीत धोरण अंगीकारून एकजुटीने प्रयत्न करणे, ही आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर (Dr. Sharadrao Nimbalkar) यांनी केले.
सावरगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शन, पशूप्रदर्शनी व शंकरपट पारितोषिक वितरण समारंभात डॉ. निंबाळकर बोलत होते.
कृषी प्रदर्शन, पशूप्रदर्शनी, शंकरपट आदी शेतकऱ्यांची संस्कृती टिकविण्याची नागपूर जिल्ह्यातील सावरगाव येथील ७१ वर्षांची महाराष्ट्रात प्रसिद्ध परंपरा दिवगंत आमदार सुनील शिंदे यांनी सुरू केली.
आता त्यांचे ज्येष्ठपुत्र तथा शंकरपट कमिटीचे संयोजक सतीश शिंदे यांनी ती सुरू ठेवली आहे. नेहमी कामात शेतीत व्यग्र शेतकरी बळीराजाला दोन दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून विरंगुळा मिळाला.
कोरोनानंतर प्रथमच कृषी, पशु व शंकरपट भव्य आयोजन यशस्वी पार पडले. कार्यक्रमात महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यांतील स्पर्धकांनी मोठा सहभाग घेतला. यावर्षी शंकरपटात एकूण २१९ बैलजोडयांनी भाग घेतला.
यात ‘अ’ आणि ‘ब’ गटातून ४२ बैल जोड्यांना पारितोषिके देण्यात आली. शंकरपट, कृषी व पशूप्रदर्शनी ७१० विजेत्यांना ३ लाख ९३ हजार ९०० रुपयांची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यात ४१ हजारांचा पहिला पुरस्कार देण्यात आला.
महेंद्र अडकीने, समीर उमप, राजू हरणे, नरेश अरसडे, संजय डांगोरे, निशिकांत नागमोते, सुभाष पाटील, सतीश रेवतकर आदी जिल्ह्यातील मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक आयोजक सतीश शिंदे यांनी केले. पंचकमेटीतर्फे जगन्नाथ मेटांगळे यांनी बक्षीस विजेत्यांना पाचारण केले. संचालन प्रवीण वासाडे यांनी केले. पंचकमेटी अध्यक्ष रमेश रेवतकर यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.