Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : बनावट पावती पुस्तकाची पोलीसांत तक्रार

APMC Scam : तक्रारीत म्हटले आहे कि, ‘‘ ॲग्रोवन या दैनिकामध्ये पुणे बाजार समितीमध्ये बनावट पावती पुस्तकाद्वारे होणाऱ्या लाखो रूपयांचे आर्थिक गैरव्यवहार दडपण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बनावट पावती पुस्तक तयार करून पार्किंग शुल्काच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या लूटीचे प्रकरण दडपण्याच्या ‘दै. ॲग्रोवन’च्या ४ जूनच्या वृत्ताची दखल घेत, बाजार समिती प्रशासनाने पोलीसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाती दोषींवर कारवाई करण्याची तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीमुळे संचालकांच्या मर्जीतील ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे.

याप्रकरणी बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे कि, ‘‘ ॲग्रोवन या दैनिकामध्ये पुणे बाजार समितीमध्ये बनावट पावती पुस्तकाद्वारे होणाऱ्या लाखो रूपयांचे आर्थिक गैरव्यवहार दडपण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

याबाबत शिवनेरी रस्त्यावर नो-पार्किंगवर शुल्क वसुलीसाठी वापरण्यात आलेल्या जमा पावती पुस्तकाची बाजार समितीकडे नोंद नसून बाजार समितीने प्रमाणितही केलेले नाही. ही बाब गंभीर स्वरूपाची असून बाजार समितीच्या हितास व नावलौकिकास बाधा निर्माण करणारी आहे. तरी बनावट पावती पुस्तकाचा तपास करून पुढील कायदेशीर कार्यवाही व्हावी.

बनावट पावती पुस्तक प्रकरणात मागील सहा महिन्यांत हजारो बनावट पावत्याच्या माध्यामातून लाखो रुपये गोळा केल्याची चर्चा बाजारात आहे. बनावट पावती पुस्तकाद्वारे लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अतिक्रमण कारवाई आणि पार्किंग शुल्क वसुली करणाऱ्या विविध ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

या प्रकारामुळे बाजार समितीचा सुरक्षा व अतिक्रमण विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यांनतर आता समितीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये सेजल ट्रेडिंग कंपनी, इनोविक ॲस्पायर इन्फ्राटेक सोल्युशन्स, राहुल तुकाराम चंदनशिवे, रामचंद्र गणु नवगीरे,मारूती दत्तात्रय माझिरे आदिंच्या नावांचा संदर्भ देत चौकशीची तक्रार दिली आहे.

बाजार समितीमध्ये संचालक नियुक्ती झाल्यापासून विविध गैरप्रकार समोर येत आहेत. यामध्ये अतिक्रमणे, अनधिकृत टपऱ्या, पार्किंग शुल्क वसुली, ठेकेदारी, अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत लिंबाचा व्यापार आदी अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. हे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता बनावट पावती पुस्तक तयार करून पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याबाबत विविध संचालकांच्या नावांची चर्चा बाजार आवारात आहे.

असा आहे गैरव्यवहार

मूळ पावतीवर पन्नास हजारांचा सेस जमा. बनावट पावती क्रमांक ४८३९ या पावतीवर २८ मे रोजी संतोष रेणुसे यांच्या एमएच १२ क्यूआर ९३१६ या वाहनाला नो पार्किंगच्या नावाखाली ३२० रुपये शुल्क वसूल केल्याचे समोर आले आहे. तर १० सप्टेंबर २०२३ रोजी ४८३९ या वैध पावती क्रमांकाद्वारे मे सेजल ट्रेडिंग कंपनीने ४४ हजार १९ रुपयांचा सेस बाजार समितीकडे भरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT