Money Lending Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Money Lending : अवैध सावकारीच्या कारणाने दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार

Crime News : अवैध सावकारीच्या व्यवहारातून जमीन हडपण्याच्या प्रयत्न होत असल्याच्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर आलेल्या अहवालावरून दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Agrowon

Akola News : अवैध सावकारीच्या व्यवहारातून जमीन हडपण्याच्या प्रयत्न होत असल्याच्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर आलेल्या अहवालावरून दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शीटाकळी सहकारी संस्था सहायक निबंधकांनी या बाबत पोलिसांना पत्र दिले होते. त्यावरून आनंदा शिवराम मोहाडे (ता. शेंदुर्जना मोरे, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम) आणि रमेश साहेबराव देशमुख (रा सावरखेड, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांच्याविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

सावरखेड येथील महिलेने या बाबत तक्रार केली होती. तिच्या पतीच्या उपचारासाठी दोन लाख रुपये घेतले होते. याबदल्यात जमीन गहाण ठेवली होती. दुर्दैवाने पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी रक्कम परतही केली. मात्र संबंधितांकडून शेती परत करण्यास टाळाटाळ केली जात होती. या प्रकरणी त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्हा निबंधकांनी आदेश देत पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना आपल्या अधिकाऱ्याला केली होती.

त्यावरून दाखल तक्रारीनुसार पोलिसांत पुढील कार्यवाही करण्यात आली. आनंदा मोहाडे व रमेश देशमुख यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान विविध व्यवहारांची कागदपत्रे आढळून आलेली आहेत.

अकोला जिल्ह्यात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तींकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशा व्यक्तीची तक्रार आवश्यक पुराव्यासह आपल्या तालुक्याच्या उपनिबंधक सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात अर्ज दाखल करावी. तसेच ज्या नागरिकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा सहकार विभागाकडील परवानाधारक सावकार यांच्याकडून रीतसर कर्ज घ्यावे.
- डॉ प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT