Bail Pola Agrowon
ॲग्रो विशेष

Bail Pola : बैलांविना साजरा होतोय पोळा

Bail Pola Update : ग्रामीण भागाचे झपाट्याने होणारे शहरीकरण, घटणाऱ्या शेतीक्षेत्राबरोबरच पशुधनाची घटणारी संख्या आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गावांमध्ये बैलांविना पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे.

Team Agrowon

Daund News : ग्रामीण भागाचे झपाट्याने होणारे शहरीकरण, घटणाऱ्या शेतीक्षेत्राबरोबरच पशुधनाची घटणारी संख्या आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गावांमध्ये बैलांविना पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी (ता.३) बैलपोळा साजरा होत आहे. राजेगाव (ता.दौंड) परिसरात घटणाऱ्या बैलजोड्यांमुळे अवघ्या तेरा बैलजोड्यांचा पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे. पूर्वी सरासरी ५०० ते ६०० बैलजोड्यांचा पोळा साजरा होत असल्याचे ज्येष्ठ शेतकरी सांगत आहेत.

ओढ कामांसाठी बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पूर्वी जुन्या राजेगावमध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. ज्यांच्याकडे जमीन त्यांच्याकडे बैलजोडी हे समीकरण ठरलेलेच असायचे. शेतकरी एकत्र येऊन शेतीच्या मशागतीची कामे करत असत. त्याला सावड म्हटले जायचे. यामध्ये दोन बैलाची नांगरी, चार आणि सहा बैलांचा नांगर यांचा समावेश असायचा. मात्र शेतीच्या वाटपामुळे कमी झालेले क्षेत्र, यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरची संख्या वाढली यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे.

केवळ तेराच बैलजोड्या

राजेगावात आता केवळ तेराच बैल जोड्या शिल्लक राहिल्या आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडील पशुधन कमी होत चालले आहे. राजेगावमध्ये बाळासाहेब मेंगावडे, ज्ञानेश्वर कदम, भगवान गावडे, रामदास टेंगले, उमेश शिंदे, बापू घोगरे, बबन पासलकर, लालासो शिदे, विठ्ठल शेडगे, केशव गुरव, संतोष कडू, नवनाथ गायकवाड, बाळासाहेब खराडे यांच्याकडेच बैलजोड्या असल्याचे सांगितले.

एकट्या राजेगाव आणि परिसरात काही वर्षांपूर्वी सुमारे ५०० बैलजोड्या होत्या. सकाळी बैलांना नदीवर नेऊन अंघोळ घातली जायची. नंतर बैलांना सजवले जायचे. संध्याकाळी सर्व गावांतील बैल मारुतीच्या मंदिरासमोर आणत. पाटलांच्या मानाच्या बैलजोडीचा पहिला मान व नंतर इतर. पुढे ग्रामदैवत राजेश्वर मंदिरासमोर दर्शन घेऊन घरी जाऊन विवाहसोहळा साजरा केला जात असे. आता हे प्रमाण कमी झाले आहे.- अरविंद मोरे, शेतकरी, राजेगाव, ता.दौंड

बैलांच्या आभूषणांचे संवर्धन

काही शेतकऱ्यांनी बैलांच्या आठवणीनिमित्त बैलगाडी, औत, शिवळ, पाभर, पारंपरिक चाड, ऊस चाचणीचे औजार, ऊस बांधणीचे औजार, रुमण, येटाण, बैलाचे चाळ, झूल, शिंगातले शेंब्या, इत्यादी साहित्य जतन करून ठेवली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT