PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan: किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

Farmers First: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण देशभरातील ९ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले.

Team Agrowon

Malegaon News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते  ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण देशभरातील ९ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले. या योजनेतंर्गत एकूण २०,५०० कोटी रुपयांचे थेट हस्तांतरण ही बाब शेतकऱ्यांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा निश्चितच मोठा टप्पा आहे.

पारदर्शक, डिजिटल आणि थेट लाभाच्या या योजनेने शेतकऱ्यांच्या सन्मानात आणि आत्मविश्वासात वाढ केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी (ता. २) केले.

बारामती-शारदानगर येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे पी. एम. किसान सन्मान निधी वाटपाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आले होते. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी उत्तरप्रदेश येथील वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे व्हरचुअल प्रक्षेपण उपस्थितांनी पाहीले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रंजन तावरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, माजी जिल्हा सरचिटणी अविनाश मोठे, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ डॉ. नीलेश नलावडे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे, डॉ. विवेक भोईटे, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. संतोष गद्ररे, राजेश कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मंत्री श्री.मोहोळ यांनी केंद्र सरकारकडून ग्रामीण भागासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या योजना वास्तवात कशा उतरत आहेत याची माहिती आपल्या भाषणात सांगितली. श्री. मोहोळ म्हणाले, की पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न करत आहे, ते निश्चितच परिवर्तन घडवणारे आहेत.

शेती आणि शेती पुरक व्यवसाय करताना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या या रकमेचा फायदा होतो. ९ कोटी ७० लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. तत्पूर्वी बारामतीमधील प्रयोगशील शेतकऱ्यांचा यावेळी मंत्री मोहोळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देत सन्मान झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT