Food Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Food Processing Scheme : सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून बारा हजार प्रकल्पांचे उद्दिष्ट

PMFME Scheme Maharashtra : पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेतून यंदा (२०२५-२६) राज्यात १२ हजार वैयक्तिक प्रकल्प देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेतून यंदा (२०२५-२६) राज्यात १२ हजार वैयक्तिक प्रकल्प देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत प्रकल्प राबविण्यात आघाडीवर असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सर्वाधिक उद्दिष्ट दिले असून त्या पाठोपाठ पुणे, सांगली, अहिल्यानगर, जळगावला उद्दिष्ट देण्यात आले आहे.

उत्पादित केलेल्या शेतीमालावर शेतकऱ्यांना प्रक्रिया करता यावी. त्याची विक्री करून अधिक नफा मिळवता यावा यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजना राबविली जात आहे. कृषी विभागाकडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात आहे. २०२१-२२ मध्ये योजना सुरू झाली असली, तरी २०२२-२३ पासून योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे.

योजनेची माहिती लोकांपर्यंत जाऊन त्यात अधिक लाभार्थी शेतकरी, तरुणांनी लाभ घ्यावा यासाठी समन्वयक काम करत आहेत. भांडवली गुंतवणुकीसाठी वैयक्तिक, गट लाभार्थी, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, मूल्य साखळी, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटिंग व ब्रँडिंग आदी घटकांकरिता या योजनेतून अर्थसाह्य देण्यात येते.

तीस लाख रुपये प्रकल्प किमतीच्या वैयक्तिक गट लाभार्थी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाख रुपये, तर सामाईक पायाभूत सुविधा, मूल्यसाखळी इनक्युबेशन केंद्र या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व ३ कोटींपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरात राज्यात ७ हजार ३११ वैयक्तिक प्रक्रिया प्रकल्प उभे राहिले आहेत. गतवर्षी प्रकल्प उभे करण्यात सांगली जिल्हा आघाडीवर राहिला असून, गतवर्षी एका जिल्ह्यात ५६३ प्रकल्प उभारले. त्या पाठोपाठ अहिल्यानगरला ४८१, कोल्हापूरला ४३६, नाशिकला ४१८ प्रकल्प उभे राहिले आहेत.

तृणधान्य, मसाले, भाजीपाला, कडधान्य, फळे, दुग्ध उत्पादन, तेलबिया, पशुखाद्य आदीच्या प्रक्रियेसह मांस, वन, लोणचे, सागरी उत्पादनासाठी योजनेतून अनुदानाचा लाभ दिला जात असून प्रकल्प सुरू करण्यासाठी मात्र बॅंक कर्ज असणे आवश्यक आहे.

यंदा निश्‍चित करण्यात आलेले उद्दिष्ट

ठाणे ः २९२, पालघर ः २२८, रायगड ः २९१, रत्नागिरी ः ४१५, सिंधुदुर्ग ः २४१, मुंबई ः ११, मुंबई उपनगर ः२१, नाशिक ः ४८०, धुळे ः २२८, नंदुरबार ः २९१, जळगाव ः ४७८, अहिल्यानगर ः ४७८, पुणे ः ४८०, सोलापूर ः ४१५, सातारा ः ४१५, सांगली ः ४७८, कोल्हापूर ः ४१५, छत्रपती संभाजीनगर ः ६०३, जालना ः २२८, बीड ः २२८, लातुर ः ३५३, धाराशिव ः २९१, नांदेड ः ४१५, परभणी ः २९१, हिंगोली ः २९१, बुलडाणा ः ४१५, अकोला ः २९१, वाशीम ः २७८, अमरावती ः ४१५, यवतमाळ ः ४१४, वर्धा ः २९१, नागपूर ः ४१५, भंडारा ः २२८, गोंदिया ः २९१, चंद्रपूर ः ४१५, गडचिरोली ः १९१.\

पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेला चांगला प्रतिसाद आहे. अहिल्यानगर जिल्हा कायम पुढे राहिला आहे. अधिकाधिक शेतकरी, तरुणांनी योजनेतून अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करावा यासाठी समन्वयक नियुक्त केले आहेत. अधिक प्रक्रिया प्रकल्प उभे राहावेत या बाबत कृषी विभागाचे सतत प्रयत्न सुरू आहेत.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT