PM Kisan Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा

Kisan Sanman Nidhi Yojana : शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना जी थेट आर्थिक मदत होते, त्यामुळे अल्प व सीमांत शेतकऱ्यांना कर्जाचा भार कमी करण्यास व शेतीतील गुंतवणुकीतून चालना देण्यास मदत होते.

Team Agrowon

Akola News : शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना जी थेट आर्थिक मदत होते, त्यामुळे अल्प व सीमांत शेतकऱ्यांना कर्जाचा भार कमी करण्यास व शेतीतील गुंतवणुकीतून चालना देण्यास मदत होते. सर्वच शेतकऱ्यांसाठी शेतीतील गुंतवणुकीस चालना मिळून शेतीतील निविष्ठांच्या खर्चात बचत होत असल्याचे खासदार अनूप धोत्रे म्हणाले.

कृषी विज्ञान केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारा भागलपूर (बिहार) येथून सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याचे हस्तांतर थेट प्रक्षेपण व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

शेतीतून अधिक नफा मिळण्यासाठी कृषी मालावर प्रक्रिया, अतिघनता कापूस लागवड, पावसाच्या खंड काळात पिकाचे नियोजन या विषयांवर त्यांनी मार्गदर्शनात भर दिला. महिला शेतकऱ्यांनी मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगात हातभार लावण्याचे आवाहन धोत्रे यांनी केले.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन, फळबाग लागवड, पीकविमा, सौर कृषिपंप अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक श्रीराम वाघमारे यांनी ग्रामीण भागात शेतीपूरक आधुनिक प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या अर्थपुरवठ्यासाठी नाबार्डद्वारे कमी दराने कर्ज देण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी ‘नाबार्ड’च्या कृषिगोदाम, शीतगृह उभारणी, प्रकिया, शेतीमाल विक्री यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.

जिल्हा अग्रणी बँकेचे श्री विद्याशंकर यांनी बँकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक केव्हीकेचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन करीत गजानन तुपकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे असे नऊ शेतकरी आणि दोन महिला शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT