PM Kisan Installment  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Installment : पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यामुळे पीएम किसानचा हप्ता १३ जुलैनंतरच? 

Narendra Modi : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी या दौऱ्यावरून ९ जुलै रोजी भारतात परतणार आहेत. त्यामुळे १३ जुलैनंतर २० व्या हप्त्याच्या वितरणासाठी हालचाली सुरू होतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

Dhananjay Sanap

PM Kisan 20th Installment : शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (पीएम किसान) गाजावाजा करणाऱ्या केंद्र सरकारने २० व्या हप्त्याच्या वितरणावर मौन बाळगलं आहे. पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जातं. परंतु पंतप्रधानाच्या विदेश दौऱ्यामुळे पीएम किसानच्या २० व्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी या दौऱ्यावरून ९ जुलै रोजी भारतात परतणार आहेत. त्यामुळे १३ जुलैनंतर २० व्या हप्त्याच्या वितरणासाठी हालचाली सुरू होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. 

२० हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची अपेक्षा होती. परंतु सरकारने लाभार्थी पडताळणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. तसेच पीएम किसानचा हप्ता चुकीने सरेंडर झालेल्या लाभार्थीचा पुन्हा योजनेत समावेश करण्यासाठी प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटीपासून राबवली गेली. तर सध्या पंतप्रधान विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पीएम किसानच्या निधीला विलंब होत गेल्याचं अधिकारी सूत्रांनी सांगितलं.

२०१९ पासून पीएम किसान योजनेतून देशातील शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत डिसेंबर-मार्च, एप्रिल-जुलै आणि ऑगस्ट-नोव्हेंबर अशी तीन हप्त्यात शेतकऱ्यांना प्रति हप्ता २ हजार रुपयांप्रमाणे मदत दिली जाते. 

खरीप हंगामातील शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या निधीची मदत होते, असा दावा सरकारकडून करण्यात येतो. पीएम किसानमुळे ग्रामीण भागात आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली असून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या अडचणी कमी झाल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांची निविष्ठामधील गुंतवणूक वाढल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाने संसदेत सांगितलं.

वास्तविक मागील तीन वर्षांपासून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे प्रमुख शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी जाणकार आणि शेतकरी नेते करत आहेत. परंतु केंद्र सरकार त्यासाठी अनुकूल नाही.

दरम्यान, पीएम किसानच्या १९ हप्त्याचं वितरण फेब्रुवारी २०२५ मध्ये बिहार येथील भागलपूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. १९ हप्त्यापोटी १० कोटी शेतकऱ्यांना २२ हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला. राज्यातील ९३ लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र असून २० हप्त्यात ५० हजार शेतकऱ्यांची नव्याने भर पडेल, अशी शक्यता आहे. परंतु शेतकऱ्यांना पीएम किसानचा २० हप्ता १३ जुलैनंतरच वितरित केला जाईल, अशी चिन्हं आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gulabrao Patil: शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना व्हायला नको, गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी नेत्यानं चांगलंच सुनावलं

Farmer Loan Waive : कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार?

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १४३ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस

Poor Seed Germination: ‘महाबीज’च्या सोयाबीनची उगवणच नाही

Loan Waiver Eligible List: नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या ९६ हजार पात्र यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT