Roshan Talape
साल २००० मध्ये भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर ४,४०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तेव्हा लोक सोनं गुंतवणुकीसाठी घेत होते.
२००० ते २००५ दरम्यान सोनं ७,००० रुपयांपेक्षा महाग झालं. या काळात दरात ३,००० पेक्षा जास्त वाढ झाली.
२००८ मध्ये आर्थिक संकटामुळे सोन्याचा दर १३६३० झाला. सोनं सुरक्षित गुंतवणूक मानलं गेलं.
२०११ मध्ये सोन्याचा दर २८००० पार गेला. डॉलरची घसरण आणि जागतिक अस्थिरतेमुळे ही वाढ झाली.
२०१७ मध्ये सोनं २९१५६ प्रति १० ग्रॅम दराने विकले गेले, मागील वर्षांच्या तुलनेत स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणूक दर्शवली.
कोविड-१९ च्या काळात सोन्याची मागणी वाढली. या काळात सोन्याचे दर ५०,१५१ पर्यंत पोहोचले.
२०२३ मध्ये सोन्याचा दर ६३,२०३ रुपयांपर्यंत गेला. गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे आकर्षित झाले.
२०२५ मध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,००,२५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. हा दर गुंतवणुकीसाठी नवा शिखर ठरला.