Crop Management : पिकांच्या शास्त्रोक्‍त व्यवस्थापनातूनच उत्पादकता वाढ

Cotton Farming : कापूस, सोयाबीन, मिरची या पिकांखालील क्षेत्र या भागात सर्वाधीक आहे. सध्या कापसात उत्पादकता वाढीसाठी म्हणून सघन पद्धत पोषक ठरत आहे.
Agrowon Samvad Chandrapur
Agrowon Samvad Chandrapur Agrowon
Published on
Updated on

Chandrapur News : माती परीक्षण, बीजप्रक्रिया, पेरणीची वेळ साधणे, पेरणीकामी शास्त्रोक्‍त तंत्राचा अवलंब शिफारशीत पद्धतीनुसार काचे व्यवस्थापन या बाबी उत्पादकतेला पूरक ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करीत उत्पादकता वाढीचे उद्दिष्ट साधावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.

‘ॲग्रोवन’ आणि ‘उपरे ॲग्रो एंटरप्राइज’ यांच्या संयुक्‍त सहकार्याने तोहोगाव येथे आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मा प्रकल्प संचालक अरुण कुसाळकर, केव्हीकेचे विषयतज्ज्ञ विजय सिडाम, स्नेहा वेलादी, गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ‘ॲग्रोवन’चे वितरण व्यवस्थापक दिनेश टोंगे, उपरे ॲग्रो एंटरप्राइजेसचे संचालक प्रेमकुमार उपरे, मंडळ कृषी अधिकारी, सरपंच, उपसरपंच मानथकर यांची या वेळी उपस्थिती होती.

श्री. तोटावार म्हणाले, की कापूस, सोयाबीन, मिरची या पिकांखालील क्षेत्र या भागात सर्वाधीक आहे. सध्या कापसात उत्पादकता वाढीसाठी म्हणून सघन पद्धत पोषक ठरत आहे. परंतु जमिनीचा प्रकार आणि इतर बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांनी लागवड पद्धत अंगीकारण्याची गरज आहे.

Agrowon Samvad Chandrapur
Kahrif Crop Management : सोयाबीन, कपाशीत एकात्मिक पीक व्यवस्थापन करावे

खताच्या मर्यादित वापराकरीता माती परीक्षण महत्त्वाचे ठरते. त्यासोबतच पिकामध्ये बुरशीजन्य रोग नियंत्रित राहावा याकरिता बीज प्रक्रियेचेही महत्त्व आहे.

अरुण कुसाळकर यांनी बाजारपेठेची मागणी त्यासोबतच रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी करण्यासाठी जैविक शेतीचा अंगीकार करावा, असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. निंबोळी, दशर्पणी अर्क तयार करणे व वापराविषयीची माहिती त्यांनी दिली.

Agrowon Samvad Chandrapur
Crop Disease Management : उपाययोजना अभ्यासून रोगनियंत्रण गरजेचे

‘केव्हीके’चे विजय सिडाम यांनी ‘पंदेकृवि’ विकसित विविध उत्पादनक्षम वाण, त्यावरील कीड, रोग त्याचे नियंत्रण याविषयी सांगितले. स्नेहा वेलादी यांनी महिलांसाठीच्या प्रकिया उद्योगांची माहिती दिली. सचिन पानसरे यांनी शेतकऱ्यांनी पीक लागवड ते काढणी अशा विविध टप्प्यांवर आवश्‍यक माहिती दिली. ‘उपरे ॲग्रो एंटरप्राइजेस’चे संचालक प्रेमकुमार उपरे यांनी आंतरमशागतकामी उपयोगी पडणाऱ्या सयंत्रांची माहिती दिली.

वितरण व्यवस्थापक श्री. टोंगे यांनी ‘ॲग्रोवन’विषयी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छऐवजी रोप देत करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. ‘उपरे ॲग्रो एंटरप्राइजेस’च्या वतीने या वेळी उत्पादित संयंत्रांचा स्टॉल लावण्यात आला होता.

त्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी गोकुळ पाटील यांनी केले. वितरण प्रतिनिधी धम्मशील शेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता हंसराज पेद्दीवार, रमेश राऊत, शैलेश मोरे, प्रमोद येरावार, अमोल जेऊरकर यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com