PM Kisan Sanman Nidhi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : कृषी सहायकांच्या बहिष्कारामुळे ‘पीएम किसान’ अडचणीत

PM Kisan Scheme Update : कृषी सहायकांनी पीएम किसान योजनेवर बहिष्कार टाकल्यामुळे आता योजनेची कामे कोण करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Team Agrowon

Washim News : कृषी सहायकांनी पीएम किसान योजनेवर बहिष्कार टाकल्यामुळे आता योजनेची कामे कोण करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. योजनेची अंमलबजावणी आता अडचणीत आली असून, कामकाज ठप्प झालेले आहे.

या आधी महसूल विभागाने पीएम किसानची कामे करण्यास नकार दिला होता. आता कृषी सहायकांनी बहिष्कार टाकल्याने शेतकऱ्यांची अडचण बनली. या योजनेचे रिसोड तालुक्यात ३५ हजार ५५५ लाभार्थी आहेत. तसेच नवीन येणाऱ्या प्रस्तावांची ई-केवायसी, आधार पेडिंगची कामे कृषी सहायकाकडे आहेत. कधी-कधी लाभार्थ्यांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागत असल्याने कृषी सहायकांनी या कामावर बहिष्कार टाकला आहे.=

योजना वर्ग करताना त्यासंदर्भातील मूलभूत सुविधाही उपलब्ध करणे आवश्यक होते. ही योजना कृषी सहायकांच्या माध्यमातून राबविण्यास सुरुवात केली. मात्र कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्याचे सांगितले जाते.

मुळात कृषी विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ देणे गरजेचे होते. यामुळे कृषी सहायकांनी या योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. या लाभार्थ्यांचे पैसे वेळेत जमा झाले नाहीत, तर ते लाभार्थी कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार करतात. मुळात या योजनेची वेबसाइट कायम संथ चालते.

कधी कधी सर्व्हर डाऊन होतो. सध्या जुन्या लाभार्थ्यांना या योजनेसंदर्भात असलेल्या अडचणी व प्रश्‍न सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या तालुका कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक नवीन प्रस्ताव मान्यतेअभावी पडून आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT