Shivaji Maharaj Jayanti 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Shiv Jayanti 2024 : शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवाचे नियोजन करा

2024 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : डॉ. राजेश देशमुख ः १७ ते १९ फेब्रुवारी महादुर्गोत्सव

Team Agrowon

Pune News : ‘‘छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावरील जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आगामी उत्सव यशस्वी करावा,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह विविध मंत्री उपस्थित राहणार आहेत.

शिवजयंतीच्या आढावा बैठकीत आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशा बुचके, जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जुन्नरचे तहसीलदार रवी सबनीस आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘पोलिस विभाग, वनविभाग, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय), सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जुन्नर नगर परिषदेने संयुक्तरीत्या वाहनतळासाठी आरक्षित करावयाच्या जागांची पाहणी करून त्याप्रमाणे आराखडा करावा. शिवनेरी पायथा तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजिलेल्या कार्यक्रमांवेळी गर्दी व्यवस्थापनासाठी पोलिस विभागाने वाहतूक आराखडा तयार करावा.’’

‘‘अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दर्शन सुरू असतानाही शिवजन्मस्थानाच्या दर्शनाची रांग सुरू ठेवता येईल का, याबाबत चर्चा करून उपाययोजना कराव्यात. पुरातत्त्व विभागाने शिवजन्मस्थान वास्तू तसेच परिसराची स्वच्छता करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रोषणाई आणि सजावट करावी,’’ असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले.

महादुर्गोत्सवाचे आयोजन
पर्यटन व सांस्कृतिक विभागाने गतवर्षीपेक्षा अधिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. बैलगाडा शर्यत, कुस्ती, मॅरेथॉन, दुर्गोत्सव- हेरिटेज वॉक, टेंट सिटी, वडज व कुकडी धरण येथे वॉट स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून आदी कार्यक्रम होतील, असे पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा ढोक-पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT