Shiv Jayanti : शिवनेरी गडावर पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा

शिवजयंती सोहळ्यात सकाळी शिवाई देवीला मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यानंतर पालखी मिरवणूक, शिवजन्मस्थळी पारंपरिक शिवजन्मसोहळा, शिवकुंज इमारतीमध्ये अभिवादन सभा झाली.
Shiv Jayanti
Shiv JayantiAgrowon

Shiv Jayanti 2023 पुणे ः फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. १०) शिवनेरी किल्ल्यावरील (ता. जुन्नर) शिवजन्‍मस्थळी शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने पारंपरिक जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Shiv Jayanti
Soybean Market : अर्जेंटीनात दुष्काळ; सोयाबीन दर वाढणार?

या वेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह बाजी मोहिते, निवृत्त ब्रिगेडिअर प्रसाद जोशी, स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे उपस्थित होते. या वेळी शिवकुंज इमारतीमधील जिजाऊ आणि बालशिवबांच्या पुतळ्याला देखील मान्यवरांनी अभिवादन केले.

Shiv Jayanti
Chana Market : हरभरा खरेदी मर्यादा वाढवावी

शिवजयंती सोहळ्यात सकाळी शिवाई देवीला मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यानंतर पालखी मिरवणूक, शिवजन्मस्थळी पारंपरिक शिवजन्मसोहळा, शिवकुंज इमारतीमध्ये अभिवादन सभा झाली. या वेळी राजमाता जिजाऊ पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या अलका फुलपगार यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

‘‘चारित्र्यवान पिढी घडवायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावे लागतील. तरच देश आणि समाज सुदृढ होईल,’’ असे मत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह बाजी मोहिते यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com