soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Harvesting : सोयाबीन काढणीला वेग; उत्पादन घटीची चिन्हे

Soybean Production : जून व जुलै अखेर झालेल्या पावसाच्या ओलींवर शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या टप्प्यातच सोयाबीन पेरा केला होता. मात्र पावसाने मोठा खंड दिल्याने हे पीक धोक्यात आले.

Team Agrowon

Nashik News : जून व जुलै अखेर झालेल्या पावसाच्या ओलींवर शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या टप्प्यातच सोयाबीन पेरा केला होता. मात्र पावसाने मोठा खंड दिल्याने हे पीक धोक्यात आले. दरम्यान, पीक पिवळे पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन घटण्याने यंदा फटका बसला.

मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामावर आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबीन काढणीला वेग आला आहे. या शेतात कमी पाण्यात येणाऱ्या रब्बी पिकांकडे शेतकरी वळत आहे.

यंदा मॉन्सूनने हुलकावणी दिली.त्यामुळे अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या भरवशावर जुलै अखेर कशाबशा पेरण्या झाल्या होत्या. मात्र आता ही पिके वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने खंड दिल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन पिवळी पडली तर काही ठिकाणी सुकून गेली होती.

काही शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्याखाली पीक घेतले. मात्र असे असताना यंदा उत्पादकतेवर परिणाम दिसून आला. वाढीच्या अवस्थेत पाऊस नसल्याने फुलोरा गळून शेगांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येवला, निफाड, चांदवड, नांदगाव व सिन्नर या तालुक्यात शेतकरी शेतमजुरांच्या टोळ्या पाहून सोंगणी करण्याची लगबग करत आहेत. ही पिके शेतातून बाहेर काढून त्यात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची पेरणी करण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन आहे.

सर्वाधिक पेरा असलेल्या निफाड तालुक्यात दोन वर्षांपासून सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा १२५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. मात्र, पावसाचा खंड, त्यातच तणनाशक फवारणी केल्याने पिकावर विपरीत परिणाम दिसून येत होता.

परप्रांतीय मजुरांची उपलब्धता

यंदा सोयाबीन सोंगणीसह इतर कामांसाठी स्थानिक मनुष्यबळ पुरेसे पडत नाही. अशा पार्श्वभूमीवर काम करण्यासाठी राज्यासह मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील डांग भाग तसेच बिहार, उत्तरप्रदेश राज्यातूनही मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर नाशिक विभागात दाखल झालेले आहेत.

जिल्ह्यातील पेरणी स्थिती

सरासरी क्षेत्र १४०.६७

प्रत्यक्ष पेरणी १०७२३८

टक्केवारी

(आकडे हेक्टर) ७६२३५.३

यंदा पावसाने खूप अडचणी निर्माण केल्या त्यामुळे आता जी पीके हातात आले आहेत. ते पीक खाली करून रब्बी पेरण्याची तयारी सुरू केली आहे. यंदा कांदा पीक घेणे शक्य नाही. त्यामुळे कमी पाण्याच्या पिकांकडे आमचा कल आहे. सोयाबीनचे राणा प्राधान्याने खाली केली आहेत. एकीकडे भाव नाही, त्यातच यंदा उत्पादन घटल्याने अडचण वाढली आहे.
- सोमनाथ मोरे, शेतकरी, बदापूर, ता. येवला.
यंदा पाण्याची उपलब्धता नाही. त्यामुळे आता सोयाबीनचे रान खाली करून त्यामध्ये जनावरांसाठी चारा पिके घेण्याची नियोजन आहे. कांद्याची लागवड यंदा पाण्याअभावी होणार नाहीत.
-मंगेश कातकडे, शेतकरी, नायगाव,ता. सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT